विनाहेल्मेट युवकावर पोलिसाने थेट गोळ्या झाडल्या | पुढारी

विनाहेल्मेट युवकावर पोलिसाने थेट गोळ्या झाडल्या

पाटणा : बिहारच्या जहानाबादमध्ये विना हेल्मेट दुचाकीवरून जाणाऱ्या युवकावर पोलिसाने थेट गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. युवकाची प्रकृती अत्यवस्थ असून गोळीबार करणाऱ्या एएसआय मुमताज अहमद याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक दीपक रंजन यांनी एएसआय अहमदसह एएसआय भीम कुमार, शिपाई विनय कुमार आणि शिपाई कुमार महेश यांना याप्रकरणी निलंबित केले आहे. जखमी तरुणाचे नाव सुधीर असून तो नालंदा जिल्ह्यातील कोरथू गावाचा रहिवासी आहे. त्याचे वडील रवींद्र यादव यांनी ठाणेदार चंद्रहास कुमार यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप केला आहे.

Back to top button