मुंबई : पोलीस भरतीप्रक्रियेत तरुणाचा मृत्यू | पुढारी

मुंबई : पोलीस भरतीप्रक्रियेत तरुणाचा मृत्यू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबई पोलीस दलासाठी सुरु असलेल्या भरतीप्रक्रियेमध्ये एका २६ वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. गणेश उगले असे मृत तरुणाचे नाव असून १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली आणि तो खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला. उगले याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला उगले हा अन्य तरुणांसोबत मुंबई पोलीस दलातील शिपाई पदाच्या भरतीप्रक्रियेत सहभागी झाला होता. शुक्रवारी सकाळी तो कलिना विद्यापीठाच्या मैदानावर चाचणीसाठी उतरला. त्याने १६०० मीटरची चाचणी पूर्ण केली आणि अंतिम रेषा ओलांडल्यानंतर लगेचच तो जमिनीवर कोसळला. भरतीप्रक्रियेसाठी उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने तत्काळ त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेले.

Back to top button