जालना : बारा वर्षीय मुलाने गिळले ५ रुपयांचे नाणे; थोडक्यात बचावला जीव | पुढारी

जालना : बारा वर्षीय मुलाने गिळले ५ रुपयांचे नाणे; थोडक्यात बचावला जीव

भोकरदन : पुढारी वृत्‍तसेवा घरात खेळताना पाच रूपयाचा डॉलर सापडला. बालकाने तो तोंडात टाकल्‍यानंतर सरळ गिळला गेला. मात्र हे नाणे अन्‍न व श्‍वास नलिकेत अडकल्‍याने त्‍या मुलाला त्रास होवू लागला. मात्र डॉक्‍टरांनी शस्‍त्रक्रीया न करताच नाणे बाहेर काढून बालकाला जीवदान दिले. गणेश अर्जुन चोरमारे (रा.चोरमारे वाडी, ता. भोकरदन) असे सुखरूप असलेल्या बालकाचे नाव आहे.

गणेशने ५ रुपयाचे नाणे गिळल्याने गणेशला त्रास होउ लागला. ते पाहून त्‍याच्या पालकांनी त्‍याला भोकरदन येथील सिल्लोड रस्त्यावरील शाश्वत हॉस्पिटल येथे नेले. तोपर्यंत गणेशला श्वास घेण्यास त्रास होणे, वारंवार उलट्या होणे यासारखा त्रास होउ लागला. दरम्‍यान भोकरदन येथील डॉ. विजय साबळे व त्यांच्या टीमने एक्स रे करून नाणे अडकल्याची जागा निश्चित केली. यानंतर कोणतीही शस्त्रक्रिया न करता फोलिज कॅथेटरच्या मदतीने ५ रुपयांचे नाणे बाहेर काढण्यात डॉक्‍टरांनी नाणे काढले.

अन्‍य डॉक्‍टरांनी दिला होता नकार… 

५ रुपयांचे नाणे गिळलेल्या १२ वर्षांच्या मुलावर कोणतीही शस्त्रक्रिया न करता फोलिज कॅथेटरच्या साह्याने त्याचे प्राण वाचवण्यात भोकरदनच्या डॉक्टरांना यश आले. अन्न आणि श्वास नलिकेत अडकलेले नाणे काढण्यास अनेक खासगी रुग्णालयात नकार दिला होता. अखेरचा पर्याय म्हणून मुलास भोकरदन येथील शाश्वत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर डॉ. विजय साबळे यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्‍नातून आपले कसब लावून मुलास जीवनदान दिले. यामुळे पालकांनी डॉक्‍टरांचे आभार मानले.

हेही वाचा : 

Back to top button