मिलिंद सोमण : ओपन रॅम्पवॉक करुन केली हवा; मलाईका अरोरा झाली फिदा - पुढारी

मिलिंद सोमण : ओपन रॅम्पवॉक करुन केली हवा; मलाईका अरोरा झाली फिदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : एमटीव्हीचा शो सुपर मॉडेल ऑफ द ईयर हा शो नेहमी चर्चेत असतो. प्रत्येत आठवड्यात काहीतरी खास या शो मध्ये असते. प्रत्येकवेळी या ‘शो’मध्ये मलायका अरोरा आणि मिलिंद सोमण नवीन लूकमध्ये दिसतात.

हे दोघेही रॅम्पवॉक करुन अनेकांना भुरळ पाडताना दिसतात. आता या ‘शो’ नवा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सोमण एका वेगळ्या अवतारात दिसत आहे. या अवतारात त्याला पाहताना अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

मिलिंद सोमण च्या हॉट लुकने हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या प्रोमोमध्ये मिलिंद सोमण स्पर्धकांसोबत वेगवेगळ्या प्रकारे पोज देताना दिसत आहे. मलायका अरोरा देखील मिलिंद सोमनच्या पोज पाहून आश्चर्यचकित झाली आहे. मिलिंद सोमणचा हा लूक लोकांना आवडत आहे.

हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ५० हजारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहीला आहे. अनेकांनी मिलिंद सोमणच्या बॉडी आणि हॉट लुकचे कौतुक केले आहे. सुपरमॉडेल ऑफ द इयर 2 च्या प्रत्येक एपिसोडमध्ये स्पर्धकांना नवीन टास्क दिले जातात.

हेही वाचलत का :

‘एक थी बेगम’ फेम शाहब अलीने पत्रकारिता का सोडली?

Back to top button