बिग बॉस मराठी : मीराचे एका मागोमाग वाद, आता आविष्कारशी भांडण - पुढारी

बिग बॉस मराठी : मीराचे एका मागोमाग वाद, आता आविष्कारशी भांडण

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठी शोमध्ये पहिल्यादिवसापासून वादाला सुरुवात झालीय. जय दुधाणेसोबत भांडण झाल्यानंतर आता अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने आविष्कारसोबत वाद घातलाय. मला पहिल्या दिवसापासू त्रास देतोय, अशी भावना मीरा जगन्नाथ हिने व्यक्त केलीय. जय, स्नेहा वाघनंतर आता आविष्कारमध्ये वादाची ठिणगी पडेल.

Beed Accident : कार अपघातात दोघेजण ठार, एक जखमी

Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, खरेदीची हीच सुवर्णसंधी!

आविष्कार मीराला सांगायचा प्रयत्न करतो. बाकीच्या सदस्यांनी जसं आवरलंय, तसं किमान आवरून ठेवावं. तसे करण्यास मीराने स्पष्ट नकार दिलाय. यावर ती म्हणाली. हे आताचं नाही. तर शोच्या पहिल्या दिवसापासून हा मला त्रास देतोय. मग, काय वाद आणखी चिघळला.

हाय गर्मी! निया शर्माची ब्लॅक शॉर्ट, कंबरेला चेन आणि… (Video)

Vidya Balan : विद्या बालनची साडी पाहून नेटकरी म्हणाले…

आविष्कार म्हणाला, ‘पहिल्या दिवसाचे मला काही सांगू नकोस. प्रत्येक जण आपापलं स्वत:चं काम करतोय. बाकी साफसफाई करणं माझं काम आहे. तुला जर हे सर्व मुद्दामपणे करत असशील तर पुढे बघतो मी काय करायचंय ते!

Rakhi Sawant: राखी मोदींना म्हणते, ‘अमेरिकेहून माझ्यासाठी काहीतरी आणा’

कराडात महिलेचा शस्त्राने वार करून खून

यावर मीरा भडकली. ती म्हणाली, तुम्हाला कामे करायची असेल तर करा. नसेल जमणार तर तुम्ही मला नाही म्हणून सांगा. मी तशी तक्रार करेन. आता मी तक्रार करणारचं आहे. घरात पहिल्या दिवसापासून त्रास देतोय मला. रोज सकाळी उठून तेचं पाहायचं.

मीरा पुढे म्हणाली, पहिल्यांदा बेडरूम साफ करायची आणि मग किचन. मग का ऐकत नाही. मी नाही ना अडून बसले त्यावर. जर मी नडायला गेले ना, तर मग मी वाट लावेन. मी शांत आहे कारण ते दोन – दोन काम करत आहेत. आता यांचा वाद विकोपाला जातो की थांबतो हे पाहणं, औत्सुक्याचं ठरेल.

सुप्रीम कोर्टाच्या मेलमध्ये पंतप्रधान मोदींचा फोटो; आक्षेपानंतर सारवासारव

आरोग्य विभाग भरती परीक्षा होणारच! राजेश टोपेंचे स्पष्टीकरण

Narendra Modi And Joe Biden : ‘तुमच्‍यासाठी मीही काही कागदपत्रे आणली आहेत’

Back to top button