Rohit Pawar’s tweet : ‘सोंगाड्यां’चं राज्य आलं खरं! पण… रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत | पुढारी

Rohit Pawar's tweet : 'सोंगाड्यां'चं राज्य आलं खरं! पण... रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : “…‘पळवा पळवी’ करत ‘तुमचं आमचं जमलं’ म्हणत ‘सोंगाड्यां’चं राज्य आलं खरं! पण…” असं खोचक ट्विट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाला डिवचले आहे. हे ट्विट करत त्यांनी मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ मराठी अभिनेते-चित्रपट निर्माते दादा कोंडके यांचा फोटो शेअर केला आहे. वाचा रोहित पवार (Rohit Pawar’s tweet) 

Rohit Pawar’s tweet

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. राजकारणी एकमेकांमर सोशल मीडिया हँडलवरून विशेषतः ट्विटरवर ट्विट करून एकमेकांवर टिका करण्याचे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी सत्ताधा-यांवर दादाकोंडके यांच्या चित्रपटातील काही उपमा देत टि्वटरवरून डिवचले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ मराठी अभिनेते-चित्रपट निर्माते दादा कोंडके यांचा फोटो शेअर करत खोचक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असं म्हंटल आहे की, आजच्या राजकीय परिस्थितीबाबत दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचं झालं तर. ‘मला घेऊन चला’ म्हणून ‘पळवा पळवी’ करत ‘तुमचं आमचं जमलं’ म्हणत ‘सोंगाड्यां’चं राज्य आलं खरं!” पण सध्या ‘खोल दे मेरी जुबान’ असं म्हणण्याची वेळ राज्यातील सामान्य माणसावर आलीय. अरे राज्याच्या भल्यासाठी थोडी तरी ‘आगे की सोच’ असू द्या. नाहीतर ज्यांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं तेच उद्या म्हणतील ‘वाजवू का?’ रोहित पवारांच्या या खोचक ट्विटची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

हेही वाचा

 

Back to top button