हॅकरने तुमचे कॉल फॉरवर्ड केले आहेत का ? शोधा या ट्रिक्सच्या सहाय्याने | पुढारी

हॅकरने तुमचे कॉल फॉरवर्ड केले आहेत का ? शोधा या ट्रिक्सच्या सहाय्याने

 

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजकाल मोबाईल वापरत नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. प्रत्येकालाच मोबाईलने वेड लावलं आहे. अगदी सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री झोप लागेपर्यंतची प्रत्येक सोय मोबाईल करतो.  पण तुम्हाला माहिती आहे का, या अँन्ड्रॉईड सिस्टीममध्ये काही की अशा ट्रिक्सदेखील आहेत ज्या तुमच्या फोनला अधिक सुरक्षित ठेवू शकतात.  मोबाईलचा वापर वाढला आहे त्याचप्रमाणे त्याच्या माध्यमातून होत असलेल्या फसवणूकीच्या प्रमाणातही वाढ होताना दिसते आहे. पण यासाठी महागडे सिक्युरिटी प्लॅन घेण्यापेक्षा या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स जरूर वापरा.

अशी चेक करा मोबाईलची SAR वॅल्यू :

मोबाईलची रेडियो फ्रिक्वेन्सी म्हणजेच मोबाईलमधून बाहेर पडणारे किरण यांची फ्रिक्वेन्सी किती असावी याचे काही पॅरामीटर्स ठरवले गेले आहेत. त्यालाच मोबाईलची SAR (specific absorption rate ) वॅल्यू म्हणतात.
तर तुमच्या मोबाईलची SAR वॅल्यू चेक करणार असाल तर *#07# हा कोड टाइप करा. यानंतर मोबाईलवर मेसेज दिसेल. यात असलेला आकडा 1.6 W/Kg पेक्षा कमी असेल तर तुमचा मोबाईल वापरण्यास सुरक्षित आहे.

सीक्रेट कॉल फॉरवर्ड असे शोधा

अलीकडे मोबाईलच्या माध्यमातून सर्रास फसवणुकीचे प्रकार घडतात. कुणी अप्रत्यक्षरित्या तुमच्या मोबाईलची हेरगिरी तर करत नाही ना? हे जाणून घ्यायचं असेल तर ही माहितीपण तुमच्या गरजेची आहे. तुमच्या मोबाईलमधून ऑटोमॅटिकली कॉल फॉरवर्ड तर होत नाहीत ना हे जाणून घ्यायचं असेल तर मोबाईलमध्ये *#61# हा कोड टाइप करा. तुमचे कॉल फॉरवर्ड होत असतील तर आपोआप समजून येईल.  तर आता हे फॉरवर्ड थांबवायचं असेल तर त्याचाही उपाय आम्ही तुम्हाला सांगतो आहे. ##21# किंवा ##002# किंवा ##02# हे कोड जरूर वापरा. यामुळे बँकिंग फ्रॉड सारख्या घटना टाळता येणं शक्य आहे.

Back to top button