लग्नात गॅस गळती होऊन स्फोट, 2 मुलांसह 5 जणांचा मृत्यू, 50 जखमी | पुढारी

लग्नात गॅस गळती होऊन स्फोट, 2 मुलांसह 5 जणांचा मृत्यू, 50 जखमी

पुढारी ऑनलाइन डेस्क : राजस्थानातील जोधपूर जवळच्या एका गावात लग्न समारंभा दरम्यान दोन गॅस सिलिंडरमध्ये लिकेज होऊन मोठा स्फोट झाला. घटनेत दोन लहान मुलांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 50 लोक जखमी झाले आहे. ही घटना जोधपूरपासून 60 किमी अंतरावरील भुंगडा गावात गुरुवारी घडली.

दरम्यान माहिती मिळताच, बचाव कार्य सुरू करण्यात आले. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नसमारंभासाठी जिथे स्वयंपाकाची तयारी करण्यात येत होती. तिथे ठेवलेल्या गॅस सिलिंडरमध्ये गळती होऊन मोठा स्फोट झाला. ज्या घरात लग्न होणार होते त्या घराचा एक भाग या धमाक्यामुळे कोसळला आहे.

जिल्हाधिकारी हिमांशु गुप्ता यांनी, याला खूप गंभीर दुर्घटना म्हटले आहे. घटनेत दोन लहान मुलांसह 5 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर 50 लोक जखमी झाले आहे. त्यापैकी 42 लोकांना एमजीएच रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जखमी रुग्णांपैकी 12 रुग्ण अत्यंत गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढू शकतो. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत आज सायंकाळी जखमी रुग्णांची भेट घेऊ शकतात.

हे ही वाचा :

Shraddha murder case : आफताब आणि त्याच्या कुटुंबियांना कठोर शिक्षा व्हावी : श्रद्धाचे वडील विकास वालकर

Shital Mhatre : ‘ते’ ४८ तासात भेट द्यायला जाणार होते ना? की फक्त ‘कर नाटक’? शीतल म्हात्रेंचे खोचक ट्विट

Back to top button