पनवेल : राहुल गांधी यांच्या निषेधार्थ मनसेचे आंदोलन | पुढारी

पनवेल : राहुल गांधी यांच्या निषेधार्थ मनसेचे आंदोलन

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. याच्या निषेधार्थ भाजप, मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून उतरून निदर्शने केली.

दरम्यान, आज (दि.१९) कळंबोली येथे महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत सायन-  पनवेल महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, नवी मुंबई पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. कळंबोली मनसे शहराध्यक्ष अमोल बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button