राहुल गांधी, नाना पटोलेंना अटक करा, भाजयुमोची मागणी | पुढारी

राहुल गांधी, नाना पटोलेंना अटक करा, भाजयुमोची मागणी

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर सर्वत्र राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा रोखून दाखवा असे आव्हान दिल्यानंतर तर यामध्ये अधिकच भर पडली.

मनसेने सभा उधळण्याचा इशारा दिला तर भाजप, भाजयुमोने थेट पोलिसात तक्रार दाखल करीत अटकेची मागणी केली. शिवसेनेने सावरकरांच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. एकंदरीत अखेरच्या टप्प्यात ही यात्रा असताना राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राहुल गांधी व काँग्रेसविरोधात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. नागपुरात भाजप महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात ही आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दाखल करण्यात आली. भाजप आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली. या दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी भाजपाने केली.

आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. इतकेच नव्हे तर सात दिवसात पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली नाही तर थेट राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचा इशाराही भाजपने दिला.

राहुल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर भाजप, मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काळे झेंडे दाखवित विरोध करणाऱ्या नागपुरातील मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली गेली. याच काळात राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिलीपुढे आली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे.

हे ही वाचा

कोल्हापूर : वाहने रोखली, जेवणही दिले; ‘स्वाभिमानी’ कार्यकर्त्यांनी जपली माणुसकी

साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडाने घेतलेल्या ‘या’ निर्णयाने जिंकली चाहत्यांची मने

भाजप देशभरात भीती, हिंसा, द्वेष पसरवत आहे : राहुल गांधींचा हल्लाबोल

Back to top button