Weather Update: पुढील पाच दिवस दक्षिण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा | पुढारी

Weather Update: पुढील पाच दिवस दक्षिण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

पुढारी ऑनलाईन:  पुढील पाच दिवस दक्षिण किनारपट्टी आणि मध्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आणि झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि वादळाची शक्यता हवामान विभागाने दिला आहे.

भारतीय हवामान खात्याने केरळच्या इडुक्की, थिरुवनंतपुरम, पठाणमथिट्टा आणि कोल्लम जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ आणि इतर अनेक शेजारील जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. IMD ने मंगळवार आणि बुधवारी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल येथे मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे.

पुढच्या चार दिवसांत दक्षिण भारतात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 14 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

महाराष्ट्रातही जोरदार पावसाची शक्यता

महाराष्ट्र मुंबईसह संपूर्ण कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड अशा 15 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे

Back to top button