World Elephant Day : जाणून घेऊया दूर्मिळ पांढ-या हत्तीबद्दल | पुढारी

World Elephant Day : जाणून घेऊया दूर्मिळ पांढ-या हत्तीबद्दल

पुढारी ऑनलाइन डेस्क : सर्व सामान्यपणे हत्ती हा काळ्या रंगाचा असतो. भारतात हत्ती मोठ्या प्रमाणात असतो. पण अनेकदा बोलताना वाकप्रचारमध्ये पांढरा हत्ती हा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल. तर धार्मिक आणि पौराणिक साहित्यात पांढरा आणि सात सोंडाच्या हत्तीला इंद्राचे वाहन दाखवले आहे. त्याला ऐरावत हे नाव आहे. तुम्ही अनेक धार्मिक मालिकांमध्ये इंद्राजवळ हा हत्ती पाहिला असेल. मात्र, पांढरा हत्ती खरोखरच असतो का? का या देखिल फक्त कल्पना आहेत. आज हत्ती दिनानिमित्त जाणून घेऊ या दूर्मिळ पांढ-या हत्तीबद्दल…

पांढरा हत्ती हा अतिशय दुर्मिळ असतो. तो थायलंडच्या जंगलात आढळतो. तसेच म्यानमार देशाच्या जंगलामध्येही क्वचितच हा हत्ती आढळतो. ताज्या काही वृत्तानुसार म्यानमार देशात एका पांढ-या हत्तीने जन्म घेतला अशी बातमी तेथील वृत्तपत्रांनी दिली होती. त्या वृत्तपत्रांनुसार म्यानमार सरकारकडे 5 ते 6 पांढरे हत्ती सैन्यात आहेत पण याबाबत गुप्तता पाळली जाते. असे असले तरी पांढरा हत्ती ही कल्पना नसून तो प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. मात्र, अतिशय दुर्मिळ आहे.

तसे पाहिले तर हा हत्ती पूर्णपणे पांढरा नसतो. तो हलक्या गुलाबी रंगाचा असतो. मात्र, काळ्या हत्तीचा विरुद्ध अर्थी शब्द म्हणून त्याला पांढरा हत्ती असे नाव पडले.

पांढ-या हत्तीबद्दल शास्त्रीय माहिती
  • एक स्वस्थ पांढ-या हत्तीला 300 किलो जेवण आणि 160 किलो पाण्याची आवश्कता असते.
  • हा हत्ती सामान्यपणे 60 ते 65 वर्षे जगतो. मात्र एक हत्ती 86 वर्षे जगला होता, अशी नोंद आहे.
  • पांढ-या हत्तींची सोंड खूप ताकदवर असते ती जवळपास 350 किलोग्राम वजन उचलू शकते.
  • हा एक सामाजिक प्राणी आहे आणि तो कुटुंब करून राहतो. या हत्तीच्या कुटुंबात एक नर हत्ती असतो तर दोन ते तीन मादा हत्तीणी आणि त्यांची पिल्ले असतात.
  • पांढ-या हत्तींना पावसाचा पूर्व अंदाज कळतो. हे 150 मैल लांबपासून पावसाचा अंदाज लावू शकतात.
  • हे हत्तीसुद्धा काळ्या हत्तीप्रमाणे शाकाहारी असतात आणि जेवणात झाडांच्या फांद्या, पत्ते आणि केळी खातात.
  • पांढरे हत्तीसुद्धा काळ्या हत्तीप्रमाणेच कुशाग्र बुद्धिचे स्वामी असतात. एका वयस्क पांढ-या हत्तीचे वजन जवळपास 8000 किलो इतके असू शकते.
  • पांढरा हत्ती जंगलात 5 किलोमीटर लांब पासून हुंगुण जंगलात पाणी कुठे आहे आणि कोणत्या दिशेत आहे याचा पत्ता लावू शकतात.
    पांढरा हत्ती आवाजावरून स्त्री किंवा पुरुष असा फरक समजू शकतो.

    पांढरा हत्ती स्वप्नात दिसणे शुभ की अशुभ

पांढरा हत्ती हा दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये खूपच पवित्र मानला जातो. हिंदू धर्मात देवराज इंद्राचे ते वाहन आहे. जैन आणि बुद्ध धर्मात या हत्तीला खूप महत्व आहे. स्वप्न शास्त्राप्रमाणे अनेकदा प्राणी स्वप्नात दिसणे याला वेगवेगळे अर्थ देण्यात आले आहे. त्यामध्ये पांढरा हत्ती दिसणे हे स्वप्न शास्त्राप्रमाणे अतिशय शुभ मानले गेले आहे. पांढरा हत्ती हा ऐश्वर्याचा प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे पांढरा हत्ती स्वप्नात दिसणे म्हणजे तुमच्या आयुष्यात राजयोग सुरू होणार आहे, असे मानले जाते.

Back to top button