मंत्री अनिल परब ‘ईडी’ चौकशीला गैरहजर | पुढारी

मंत्री अनिल परब ‘ईडी’ चौकशीला गैरहजर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावूनही शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब हे चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यांनी बुधवारी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मुंबईत परतल्यानंतर ‘ईडी’ चौकशीला हजर राहणार असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे ‘ईडी’ आता परबांना दुसरे समन्स जारी करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनी लाँडरिंगचा गुन्हा परब यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात ‘ईडी’ने परब यांना बुधवारी सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, परब चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यांनी वकिलांमार्फत ‘ईडी’ला पत्र पाठवून चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला असल्याची माहिती मिळाली आहे.

Back to top button