UPSC result : युपीएससी परीक्षेत प्रथम आलेली श्रुती शर्मा म्हणाली, “यश निश्चित… “ | पुढारी

UPSC result : युपीएससी परीक्षेत प्रथम आलेली श्रुती शर्मा म्हणाली, "यश निश्चित... "

पुढारी ऑनलाईन डेस्क :  युपीएससी परीक्षेत यश मिळणार हे निश्चित होते; पण देशात पहिली येईल असं वाटलं नव्हते. माझ्‍यासाठी हे यश आश्चर्यकारक आहे. माझ्य़ा यशात माझ्या पालकांसह मार्गदर्शकांचा वाटा खूप महत्त्वपूर्ण आहे., अशा शब्‍दात केंद्रीय लाेकसेवा आयाेगाच्‍या ( युपीएससी ) परीक्षेत देशात प्रथम आलेली श्रुती शर्मा हिने आपली भावना व्‍यक्‍त केली. ( UPSC result )

UPSCResult2022

UPSC result : श्रुती शर्मा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२१ च्या नागरी सेवा परीक्षेचाआज अंतिम निकाल (UPSC Result) जाहीर झाला. या परीक्षेत श्रुती शर्मा  संपूर्ण देशात ही अव्वल आली आहे.अंकिता अग्रवाल द्वितीय तर गामिनी सिंगला तृतीय आली आहे.  श्रुती ही सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे. तिने जामिया मिलिया इस्लामिया कोचिंग अकादमीमध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती.
UPSC CSE पूर्व परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी झाली. या परीक्षेचा निकाल २९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षा ७ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली होती. मुख्‍य परिक्षेचा निकाल १७ मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. उमेदवारांच्या मुलाखती ५ एप्रिलपासून सुरू झाल्या होत्या. २६ मेपर्यंत मुलाखती घेण्यात आल्या हाेता. यंदाच्‍या युपीएससी निकालाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे देशात पहिल्‍या तिन्‍ही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे.
UPSC Result अंतिम निकाल पाहण्यासाठी upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Back to top button