राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी महाराष्‍ट्रात भोंग्याच राजकारण : संजय राऊत  | पुढारी

राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी महाराष्‍ट्रात भोंग्याच राजकारण : संजय राऊत 

पुढारी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी भोंग्याचं राजकारण केलं जात आहे, हे सर्व निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच राज्यातील वातावरण बिघडवलं जात आहे, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

या वेळी राऊत म्हणाले, यापूर्वी कधीच हनुमान जयंती आणि राम नवमीला  हिंसा झाली नाही. या घटनांवर पंतप्रधान गप्प का? असा सवाल करत पंतप्रधानांनी देशातील एकतेवर बोलण्याची गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण कोल्हापूरातील निकालाने याला सडेतोड उत्तर दिले आहे.

दंगे भडकवणे हे नव हिंदुत्व ओवेसीचं लक्ष्य आहे. अशा प्रकारचं षडयंत्र आम्ही खपवून घेणार नाही. हे षडयंत्र उधळून लावलं जाईल, असेही संजय राऊत म्‍हणाले. 

हेही वाचा :

 

Back to top button