… तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ : राज ठाकरे | पुढारी

... तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ : राज ठाकरे

पुणे : पुढारी ऑनलाईन

भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. भोंग्यांचा सर्वांना त्रास होतोय. जर ३ तारखेपर्यंत त्यांना काही कळलं नाही किंवा देशातल्या न्यायव्यवस्थेचा निर्णय योग्य वाटत नसेल. तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी राज ठाकरे म्‍हणाले, “माणुसकीच्या नात्याने मुस्लिमांनी भोंगे बंद करावेत. आम्हाला राज्यातील शांतता भंग करायची नाही; पण भोंगे बंद करा. पाच वेळा भोंगा लावत असाल तर आम्ही पाचवेळी हनुमान चालिसा वाजविणार आहे. देशापेक्षा धर्म मोठा असा कामा नये. आमच्याही हातात शस्त्रे आहेत, ते आम्हाला हातात घेण्यास भाग पाडू नका “.   १ मे ला औरंगाबादला जाहीर सभा घेतली जाणार आहे. तर ५ जूनला अयोध्येत जाणार असल्‍याचेही त्‍यांनी जाहीर केले.

“जर मशिदीवरील भोंगे अनधिकृत असतील, तर आमच्या भोंग्यावर कारवाई का? मशिदीच्या भोंग्यांचा त्रास हा फक्त हिंदुंनाच नाही, तर मुस्लिमांनाही होतो आहे. देशातील सर्व हिंदु बांधवांनी तयार रहावं.  आमच्या मिरवणुकींवर दगडफेक होणार असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही. आमच्याही हातात शस्त्रे आहेत, ती शस्त्रं हातात घेण्यास भाग पाडू नका”, असाही इशारा राज ठाकरे यांनी दिला.

Back to top button