Bank of Baroda : बँक ऑफ बडोदामध्ये ४७ कृषी विपणन अधिकारी पदांसाठी भरती | पुढारी

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदामध्ये ४७ कृषी विपणन अधिकारी पदांसाठी भरती

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Bank of Baroda) बँक ऑफ बडोदाने ४७ कृषी विपणन अधिकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार येत्या २७ जानेवारी २०२२ पर्यंत या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात.

या भरतीसाठी अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जानेवारी २०२२

वेतन : रु. १५ ते १८ लाख रुपये (प्रति वर्ष)

शैक्षणिक पात्रता

(Bank of Baroda) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विषयातील ४ वर्षांची पदवी (पदवी), २ वर्षे पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा भारत सरकारच्या संस्था/AICTE आणि PGDM मध्ये डिप्लोमा आणि किमान ३ वर्षांचा विपणन आणि BFSI क्षेत्रातील कृषी आणि संबंधित उद्योग व्यवसायातील अनुभव.

वयोमर्यादा

(०१.०१.२०२२ रोजी) २५ ते ४० वर्षे.

निवड प्रक्रिया

निवड वैयक्तिक मुलाखतीवर आधारित असेल.

अर्ज फी

सामान्य/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ६००/- आणि SC/ST/PWD उमेदवारांसाठी रु. १००/-.

हेही वाचलत का?

Back to top button