लेखिका, शिक्षण तज्ज्ञ मारिया अरोरा कुटो यांचे निधन | पुढारी

लेखिका, शिक्षण तज्ज्ञ मारिया अरोरा कुटो यांचे निधन

पणजी, पुढारी वृत्तसेवा : ‘गोवा : अ डॉटर्स स्टोरी’ या पुस्तकाच्या लेखिका, शिक्षण तज्ज्ञ, समीक्षक मारिया अरोरा कुटो यांचे आज (शुक्रवारी) निधन झाले. त्या गेले काही दिवस आजारी होत्या. उत्तर गोव्यतील हळदोणे येथे त्या राहत होत्या. गोवा विद्यापीठासोबत डीडी कोसंबी महोत्सव सुरु करण्यात त्यांनी मदत केली होती.

२०१० साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कुटो यांनी दिल्लीच्या लेडी श्री राम महिला महाविद्यालय आणि पणजीतील धेंपे महाविद्यालयात इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापक म्हणून काम केले आहे. भारत आणि अमेरिकेतील नियतकालिकांमध्ये त्यांनी लिखाण केलेले आहे.

प्राध्यापिका असताना त्यांनी फिल्म क्लब सुरू केला होता. ए. बी. ब्रागांझा परेरा यांच्या गोवा, दमण आणि दिवमधील पोर्तुगीज काळापासूनचे मानववंश विज्ञानचे भाषांतर केले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विटर वरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साहित्य, कला, विज्ञान क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Back to top button