पुणे/कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नववी व दहावी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावी निकाल तयार केला आहे. आज शुक्रवारी (दि. 16) दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने दहावी निकाल जाहीर होणार आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी गुरुवारी दिली.
अधिक वाचा :
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी परीक्षा 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण विद्यार्थ्यांना पाहता येतील.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.
दहावीची परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्या होत्या. मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे.
अधिक वाचा :
कोल्हापूर विभागात 1,39,518 विद्यार्थी
कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून 1 लाख 39 हजार 518 विद्यार्थ्यांचा निकाल कोल्हापूर विभागीय मंडळाच्या वतीने ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
यंदाची दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या दरम्यान आयोजित केली होती. पण कोरोना संकटामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अधिक वाचा :
यंदा दहावी परीक्षेसाठी १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी आणि ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनींचा समावेश होता.
येथे पाहा निकाल : http://result.mh-ssc.ac.in
हे ही वाचा :