मेलोनी यांचा मोदींसोबत सेल्फी अन् इंटरनेटवर पुन्‍हा #Melodi ट्रेंड | पुढारी

मेलोनी यांचा मोदींसोबत सेल्फी अन् इंटरनेटवर पुन्‍हा #Melodi ट्रेंड

पुढारी ऑनलाईन डेस्क : इटलीतील अपुलिया येथे जी ७ शिखर परिषदेच्या ‘आउटरीच नेशन’ सत्रात जागतिक नेत्यांनी फोटोसाठी एकत्र पोझ दिली. जी ७ परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांची भेट घेतली. मोदींनी सर्व देशांशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सेल्फी आणि नमस्तेची सर्वाधिक चर्चा इंटरनेटवर हाेत आहे.

Italian PM Meloni clicks selfie with PM Modi
Italian PM Meloni clicks selfie with PM Modi

जागतिक नेत्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान आणि जी ७ शिखर परिषदेच्या यजमान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे मेलोनी यांनी भारतीय पद्धतीने नमस्कार म्हणत मोदींचे स्वागत केले. मोदी यांनी मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली आणि दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यावर चर्चा केली. त्यानंतर मेलोनी यांनी जी ७ शिखर परिषदेच्या व्‍यासपीठाजवळ पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी काढला आणि सेल्फी व्हिडिओ केला. मेलोनी यांनी हा सेल्फी व्हिडिओ इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये त्या “मेलोडी टीमकडून नमस्कार…,” असे म्हणत आहेत. मेलोनी आणि मोदी यांचा हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत असून, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंटरनेटवर व्हायरल झालेल्या #Melodi ट्रेंडनंतर आता पुन्हा #Melodi असा ट्रेंड इंटरनेटवर सुरू आहे.

मेलोनी यांचा मोदींसोबत दुसरा सेल्फी

पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मेलोनी यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर यूजर्स #Melodi हॅशटॅगने व्हायरल करत असतात. गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या G-20 शिखर परिषदेत पंतप्रधान मेलोनी सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी मोदी आणि मेलोनी यांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘जागतिक हवामान शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर मेलोनी यांनी मोदी यांच्यासोबत सेल्फी घेतला होता. नंतर त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तो सेल्फी शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये #Melodi हा हॅशटॅग वापरला होता. त्या सेल्फीनंतर मोदी यांच्यासोबतचा त्यांचा हा दुसरा सेल्फी आहे.

हेही वाचा : 

Back to top button