Industry News : रोड नेटवर्किंगमध्ये भारत दुसऱ्या स्थानी; अमेरिकेलाही टक्कर देण्याची तयारी | पुढारी

Industry News : रोड नेटवर्किंगमध्ये भारत दुसऱ्या स्थानी; अमेरिकेलाही टक्कर देण्याची तयारी

पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा : रोड नेटवर्क अर्थात रस्ते आणि महामार्गाच्या जाळ्यामध्ये भारताने चीनला मागे टाकत जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे. रोड नेटवर्कमध्ये अव्वल स्थानी अमेरिका असून, त्यापाठोपाठ आता भारताचे स्थान असणार आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला भरारी घेण्यास चालना मिळणार आहे

  • केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या काळात भारतातील रस्ते, महामार्ग आणि एक्स्प्रेस वे प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लागल्यामुळे भारत जगात रस्ते नेटवर्किंगमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर पोहोचला आहे.
  • नजीकच्या काळात रस्त्यांच्या जाळ्यात अमेरिकेला टक्कर देण्याचा भारताचा प्रयत्न राहणार आहे. रोड नेटवर्किंगमध्ये पाकिस्तानचा नंबर पहिल्या दहा देशांच्या यादीतही नाही.
  • २०१४ सालानंतर भारतात १.५ लाख किलोमीटरवरील नवीन रस्ते प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आले आहेत.
  • १०० तास १०० किलोमीटर एक्स्प्रेस वेचे काम पूर्ण करून भारताने विक्रम प्रस्थापित केला आहे.
  • गेल्यावर्षी १०६ तासांत ७५ किलोमीटरचा महामार्ग तयार केल्याने भारताच्या विक्रमाची नोंद गिनिज बुकमध्ये झाली.
  • जहाजाशिवाय विमानाचे लैंडिंग होईल, अशाप्रकारची बांधणी आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर करण्यात आली आहे.

अमेरिका : ६८ लाख किलोमीटर अंतरावर रस्त्यांचे जाळे
भारत : ६३.७ लाख कि.मी. वर रस्त्यांचे जाळे
चीन : ५१.९ लाख कि. मी. पर्यंत रस्त्यांचे नेटवर्क
ब्राझील : २० लाख कि.मी.
रशिया : १५.२ लाख कि.मी.
फ्रान्स : १०.५ लाख कि. मी.
कॅनडा : १०.४ लाख कि. मी.
ऑस्ट्रेलिया : ८.७३ लाख कि.मी.
मेक्सिको : ८.७ लाख कि. मी.

Back to top button