NSA Meeting : अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर ‘सात’ देशांच्या प्रतिक्रिया | पुढारी

NSA Meeting : अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर 'सात' देशांच्या प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानातील परिस्थिती सुधारण्यासाठी अजित डोवल यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक (NSA Meeting) आयोजित करण्यात आली होती. दिल्लीत आयोजिक केलेल्या या बैठकीत सात देशांनी सहभाग घेतला. यामध्ये रशिया, इराण, तजाकिस्तान, किर्गिस्तान, कजाकिस्तान, उज्बेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान सहभागी झाले होते. यामध्ये सर्व देशांचे सुरक्षा अधिकारी भारताच्या मताशी सहमत होते आणि त्यांनी अफगाणिस्तानमध्ये मदत करण्याचीही हमी दिली.

या बैठकीत अफगाणिस्तानमधील कट्टरतावाद, हिंसा आणि वैश्विक दहशतवाद वाढीस लागणार नाही, यावर जोर देण्यात आला. तसेच अफगाण समाजात भेदभाव असणार नाही आणि सर्वजण समान असणार यावर सहमती दर्शविण्यात आली. भारताकडून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पाकिस्तान आणि चीन या देशांनाही आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या बैठकीत सहभाग घेतला नाही.

अध्यक्षपदावरून (NSA Meeting) अजित डोवल म्हणाले की, “आपण सर्व अफगाणिस्तानातील परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. त्या देशात होणाऱ्या घटना आणि घडामोडी आपण जवळून पाहत आहोत. ही बैठक अफगाणिस्तानासाठी नव्हे तर शेजारील राष्ट्रांसाठीदेखील महत्वाची आहे. मला विश्वास आहे की, या बैठकीतून काही प्रोडक्टिव्ह आणि उपयोगी होईल. तसेच अफगाणिस्तानच्या लोकांना मदत करणे आणि आपली सर्वांची सामुहिक सुरक्षा वाढविण्यात योगदान मिळेल.”

तजाकिस्तान अफगाणिस्तानला मदत करणार

तजाकिस्तानचे सुरक्षा परिषदेचे सचिव नसरलो रहमतजोन महमूदजोदा म्हणाले की, “अफगाणीस्तानसोबत आमची सीमारेषा लांबपर्यंत आहे. वर्तमान स्थिती ही अंमली पदार्थ्यांची तस्करी, दहशतवाद आणि अधिक धोका उत्पन्न करण्याची शक्यता आहे. तजाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमांवर स्थिती अधिक गुंतागुंतींची झालेली आहे. आम्ही अफगाणीस्तानचे शेजारील राष्ट्र म्हणून प्रत्येक बैठकीत सहभागी होण्यास तयार आहोत, तसेच अफगाणिस्तानला मदतदेखील करू शकतो”, अशी भूमिका तजाकिस्तानने मांडली आहे.

इराण म्हणतं, “सर्वांना एकत्र येण्याची गरज…”

इराणचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव एडमिरल अली शामखानी म्हणाले की, “अफगाणिस्तानमध्ये स्थलांतरीतांचा प्रश्न बिटक आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सर्वसमावेशक सरकार येऊ शकते. या प्रश्नांना सोडविण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे.

किर्गिस्तान म्हणतं, “अफगाणिस्तानातील स्थिती चिंताजनक…”

किर्गिस्तानचे सुरक्षा परिषदेचे सचिव मरात एम इमांकुलोव म्हणतात की, “आमच्या क्षेत्रात आणि जगभरात खूप कठीण परिस्थिती आहे. ही स्थिती अफगाणिस्तानात असणाऱ्या दहशतवादी कारवायांवरून आहे. संयुक्त प्रयत्नातून अफगाणिस्तानात लोकांची मदत केली जाणे आवश्यक आहे.

तुर्कमेनिस्तान म्हणतं, “अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापिक करण्याची आवश्यकता”

तुर्कमेनिस्तान म्हणतं की, “तुर्कमेनिस्तान सुरक्षा परिषदेचे सचिव चारमिरत अमानोव म्हणतात की, या बैठकीत अफगाणिस्तानात सध्याच्या परिस्थितीवर समाधान शोधण्याची आणि शांतता प्रस्थापिक करण्याची संधी मिळाली आहे.

उज्बेकिस्तान म्हणतं, “सामुहिक समाधान शोधणं गरजेचं..”

उज्बेकिस्तानच्या सुरक्षा परिषदेचे सचिव मखुमदोव म्हणाले की, “अफगाणिस्तान आणि इतर क्षेत्रात पूर्णपणे शांतता निर्माण करण्याच्या दृष्टीने सामुहिक पर्याय शोधणं गरजेचं आहे. आणि हे सर्वांच्या प्रयत्नातूनच शक्य आहे. एकंदरित, तालिबानने काबुलवर नियंत्रण मिळविल्यानंतर दहशतवाद, कट्टरतावाद आणि अंमली पदार्थांची तस्करी वाढत्या धोक्यांवर अफगाणिस्तानला व्यावहारिक सहयोग करण्याची प्रयत्नात भारत आहे.

Back to top button