अमेरिकेच्या मदतीशिवाय युद्ध हारू : झेलेन्स्की | पुढारी

अमेरिकेच्या मदतीशिवाय युद्ध हारू : झेलेन्स्की

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : युक्रेनसाठी अमेरिकेची मदत खूपच महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे अमेरिकेच्या मदतीविना रशियाविरोधातील युद्ध जिंकण्याऐवजी हारू, असे वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले आहे. झेलेन्स्की यांनी अमेरिकन दौर्‍यात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनी लष्कराला मोठ्या संरक्षण साहित्य पॅकेजची गरज आहे. 575 दिवसांच्या युद्धाच्या कठीण काळात अमेरिकन नागरिक युक्रेनसोबत राहिल्याबद्दल आभार मानतो. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी युक्रेनला मदतीची घोषणा केली.

यामध्ये युद्धासाठी 128 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1 हजार 61 कोटी रुपये) मदत आणि अमेरिकन संरक्षण विभागाकडून 198 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1 हजार 642 कोटी रुपये) किमतीचे संरक्षण साहित्य दिले जाणार आहे. आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला 110 अब्ज डॉलर्सची (सुमारे 9 लाख 11 हजार कोटी) मदत केली आहे. यामध्ये 43 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण साहित्यांचा समावेश आहे, पण अमेरिकेतील विरोधी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे खासदार युक्रेनला सातत्याने दिल्या जाणार्‍या मदतीला विरोध करत आहेत.

Back to top button