Switzerland Burqa Ban | स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी, उल्लंघन करणार्‍यांना दंड, जाणून घ्या काय आहे कायदा? | पुढारी

Switzerland Burqa Ban | स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी, उल्लंघन करणार्‍यांना दंड, जाणून घ्या काय आहे कायदा?

जिनिव्हा, पुढारी ऑनलाईन : स्वित्झर्लंड संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने बुधवारी बुरखा बंदीच्या निर्णयाला मंजुरी दिली. काही मुस्लिम महिला चेहरा झाकण्यासाठी परिधान करत असलेल्या बुरख्याला बंदी घालण्यासाठी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने अंतिम मंजुरी देण्यासाठी मतदान घेतले. नॅशनल कौन्सिलने १५१-२९ अशा मतफरकाने या कायद्याचा मार्ग मोकळा केला. या कायद्याला आधीच वरिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली होती. बुरखा बंदी कायद्यासाठी उजव्या विचारसरणीच्या लोकप्रिय स्विस पीपल्स पार्टीने पुढाकार घेतला होता. (Switzerland Burqa Ban)

 संबंधित बातम्या 

हे पाऊल दोन वर्षांपूर्वीच्या देशव्यापी सार्वमताच्या बाजूने आहे; ज्यात स्वित्झर्लंडमधील मतदारांनी चेहरा झाकण्यासाठी वापरण्यात येणारे नकाब आणि बुरखा तसेच काही आंदोलकांनी परिधान केलेल्या स्की मास्क आणि बंदनास यांना बंदी घालण्यास सहमती दर्शवली होती.

संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने या बंदीचे फेडरल कायद्यात रूपांतर केले आहे आणि याचे उल्लंघन करणार्‍यांना १ हजार फ्रँक (सुमारे १,१०० डॉलर) पर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद केली आहे. यामुळ‍े आता काही अपवादात्मक परिस्थिती वगळता सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यायोग्य खासगी इमारतींमध्ये नाक, तोंड आणि डोळे झाकण्यास मनाई राहणार आहे.

स्वित्झर्लंडमधील दक्षिण टिसिनो आणि उत्तर सेंट गॅलन या दोन प्रशासकीय प्रदेशात आधीपासूनच समान कायदे लागू आहेत. हा राष्ट्रीय कायदा स्वित्झर्लंडला बेल्जियम आणि फ्रान्ससारख्या देशांच्या पंक्तीत ठेवतील ज्यांनी याबाबत अशाच उपाययोजना केल्या आहेत. (Switzerland Burqa Ban)

हे ही वाचा :

Back to top button