युक्रेन युद्धात सहभागी होणार नाही | पुढारी

युक्रेन युद्धात सहभागी होणार नाही

मिन्स्क, वृत्तसंस्था : रशियाच्या खासगी लष्कर वॅग्नरचे प्रमुख येव्हगेनी प्रिगोझिन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याविरोधात बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच बुधवारी सार्वजनिकरीत्या दिसून आले. एक व्हिडीओ जारी करत त्यांनी आपल्या कंमाडोंचे बेलारूसमध्ये स्वागत केले.

वॅग्ननर आता युक्रेन युद्धात आता सहभागी होणार नाही. माझ्या कंमांडोंना आफ्रिकेच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यास सांगितले आहे. आम्ही युक्रेनशी प्रामाणिकपणे लढाई लढली. रशियासाठी आम्ही खूप काही केले असल्याचे प्रिगोझिन म्हणाले. युक्रेनमध्ये जे घडत आहे ते खूप लज्जास्पद असून आता युद्धात सहभागी होणार नाही. काही काळ बेलारूसमध्ये राहणार असून बेलारूसच्या लष्कराला जगातील सर्वात शक्तिशाली करणार असल्याचे प्रिगोझिन व्हिडीओत सांगत आहेत.

Back to top button