बॉसने दिलेल्या त्रासापोटी भारतीय महिलेला मिळणार 24 कोटींची भरपाई | पुढारी

बॉसने दिलेल्या त्रासापोटी भारतीय महिलेला मिळणार 24 कोटींची भरपाई

लंडन : आपल्या समपदस्थ सहकार्‍याला जास्त व आपल्याला कमी बोनस का दिला म्हणून विचारणा केल्यानंतर बॉसने सातत्याने छळ केला. याबाबत न्यायाधीकरणात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने ब्रिटनच्या रॉयल मेल अर्थात टपाल खात्याला एका भारतीय महिलेस तब्बल 24 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले.

कॅम जुटी असे या महिलेचे नाव असून, ती रॉयल मेल सेवेत मीडिया स्पेशालिस्ट म्हणून काम करते. तेथे तिच्याच समकक्ष असलेल्या कर्मचार्‍याला अधिक व तिला कमी बोनस देण्यात आला. या दुजाभावाबाबत तिने आपल्या बॉसकडे दाद मागितली असता, बॉसने तिचा सातत्याने छळ सुरू केला. असभ्य वागणूक, दादागिरीची भाषा व कामात त्रास देणे, असा प्रकार सुरू झाला. याविरोधात तिने रोजगार न्यायाधीकरणाकडे धाव घेत आपली बाजू मांडली. कर्मचार्‍यांना चांगली वागणूक देणे अपेक्षित असताना तिच्या साहेबाने तिला अपमानास्पद वागणूक देत छळल्याचे स्पष्ट झाल्याचे नमूद केले.

Back to top button