Monsa musa : ‘या’ राजाच्‍या दानशूर वृत्तीमुळे घसरत होत्या सोन्याच्या किमती | पुढारी

Monsa musa : 'या' राजाच्‍या दानशूर वृत्तीमुळे घसरत होत्या सोन्याच्या किमती

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्याला माहीत असलेली श्रीमंत माणसं म्हणजे इलाॅन मस्क, जेफ बेजोस, बिल गिट्स, मुकेश अंबानी, रतन टाटा वगैरे… या सगळ्यांची संपत्ती एकत्र केली तर, तितकी संपत्ती आपल्यासोबत घेऊन फिरणारा आणि येईल त्याला वाटत फिरणारा व्यक्ती जगाच्या इतिहासात होऊन गेला आहे. त्याच्याबद्दल Historically Accurate या ट्विटवरून त्यांनी म्हंटलंय की, टिम्बकटूमध्ये उभारलेलं प्राचीन शिक्षण केंद्र हे ज्याने (Monsa musa) उभारलं आहे तो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. आजपर्यंत त्या व्यक्तीच्या संपत्तीचा आकडा निश्चितपणे कुणी सांगू शकलेलं नाही. या श्रीमंत व्यक्तीचा आजपर्यंत कोणी रेकाॅर्ड तोडू शकलेलं नाही… फक्त त्या दानशूरतेमुळे तो अखेर कंगाल झाला. चला तर या अफाट संपत्ती असणाऱ्या व्यक्तीबद्दल जाणून घेऊ या!

कोण आहे श्रीमंतीत रेकाॅर्डब्रेक करणारी व्यक्ती?

पश्चिम आफ्रिकेतील टिम्बकटूचा बादशहा ‘मनसा मूसा प्रथम’ हा इतिहासातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती होता. त्याचा आजपर्यंत रेकाॅर्ड कोणीही तोडलेला नाही. माली साम्राज्यावर त्यानं राज्य केलं होतं. तो इतका श्रीमंत असण्याचं कारण इतकंच की, त्याच्याकडे खनिज पदार्थांचे भांडार होते. त्यातही असंख्य सोन्याच्या खाणी त्याच्या मालिकीच्या होत्या. त्यावेळी मनसा मूसाने माॅरिटानिया, सेनेगल, गांबिया, गिनिया, बुर्किना फासो, माली, नाइजर, चाड आणि नायजेरिया आदी देशांवर १३१२ ते १३२७ या काळात त्याचे साम्राज्य होते.

साधारणपणे अभ्यासक असं सागतात की, मनसा मूसाची संपत्ती ४ लाख मिलीयन अमेरिकन डाॅलर इतकी होती. याचं भारतीय मूल्य काढायचं झालं तर, मनसा मूसाकडे अडीच लाख काेटी रुपये इतका प्रचंड पैसा होता. आपण टेस्लाच्या इलाॅन मस्कची संपत्ती आणि अमेझाॅनच्या जेफची संपत्ती पाहिली तर तुलनेने तत्कालिन परिस्थितीचा विचार करता मनसा मूसा यांच्या कितीतरी पुढे जातो. मनसा मूसाची श्रीमंती पाहण्यासाठी इतर देशांतून लोक यायचे. त्यामुळे मूसाच्या श्रीमंतीच्या अख्यायिका तयार झाल्या. त्यातील महत्त्‍वाची आख्यायिका पाहू…

…अशी आहे त्या व्यक्तीच्या श्रीमंतीची आख्यायिका! 

१३२४ मध्ये मनसा मूसाने हजच्या यात्रेला सुरुवात केली. त्याच्या या प्रवासात तब्बल ६० हजार लोक सहभागी झाले होते. त्यातील १२ हजार लोक केवळ मूसाच्या राज्यातील कर्मचारी होते. मनसा मूसा ज्या घोड्यावर बसलेला होता, त्या समोर ५०० लोकांचा ताफा चालत होता.

या ५०० लोकांच्या हातात अस्सल सोन्याचा काठ्या होत्या. ५०० संदेशवाहक म्हणजेच आताच्या भाषेत पोस्टमन म्हणू आपण. या पोस्टमननी अस्सल रेशमी झबला घातलेला होता. या प्रवासात ८० उंटांवर १३६ किलोपेक्षा जास्त सोने लादलेले होते. या प्रवासात मनसा मूसा (Monsa musa) मिस्त्रची राजधानी काहिरामधून जात होता, तेव्हा हजोरोंच्या संख्येने गरीब लोक त्याला भेटायला आले. तेव्हा त्याने आपल्याकडे असणारी संपत्ती इतक्या मोठ्या प्रमाणात दान केली की, मिस्त्र देशाची अर्थव्यवस्थाच कोसळली.

मूसाने वाटलेल्या सोन्यामुळे १० वर्षं त्या देशात सोन्याचे भाव अर्ध्यापर्यंत राहिले. त्याचा सोने वाटण्याच्या दानशूरपणामुळे मध्य पूर्व क्षेत्राला सुमारे १.१ बिलीयन म्हणजेच १०० अरब रुपयांपेक्षाही जास्त नुकसान सहन करावे लागले होते. विद्वानांनी आपल्यासोबत हज यात्रेला यावे, यासाठी मनसा मूसाने तब्बल २०० किलो सोने दिलेले होते.

या सोन्याची किंमत ६.३ बिलीयन पाऊंडहून जास्त होती. इतिहासकार असं सांगतात की, जगातील प्रमुख सोन्याची व्यापारी केंद्रांपैकी अनेक केंद्रं ही मूसाच्या राज्यातच होते. यातून त्याला खूप नफा मिळत असे. खरंतर मूसाने टिम्बकटूसहीत २४ शहरांचा व्यापार मार्ग बंद केला होता. परिणामी, सर्व नफा मूसाला मिळत होता. त्यामुळे त्याच्याकडे सर्वात जास्त संपत्ती होती.

संपत्तीचा उपयोग केला समाज विकासासाठी…

इतिहासाकारांकडून असं सागितलं जातं की, मनसा मूसा याने १४ व्या शतकात पश्चिम आफ्रिकेमध्ये शिक्षणाची परंपरा  प्रथम सुरू केली. त्याचबरोबर त्यांनी साहित्य, कला आणि वास्तुकला आदी कला क्षेत्रांमध्ये त्याने आपल्या संपत्तीचा उपयोग करून समाजाचा विकास केला.

इतकंच नाही तर, त्याने ग्रंथालये, शाळा आणि मशीद बांधण्यासाठी आपल्या संपत्तीचा वापर केला. हजच्या यात्रेतून परत फिरताना मूसाच्या लक्षात आलं की, मिस्त्रची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे, त्याने पुन्हा ही अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले.

यासाठी मूसाने सोन्यावर व्याज घेण्यास सुरूवात केली होती. पण, मूसाच्या (Monsa musa) दानशुरपणामुळेच त्याच्या राज्याचीही आर्थिक परिस्थिती ढासळली. त्याचे राज्य गरिबीमध्ये ढकलले गेले. त्याचा मृत्यू १३२७ साली झाला. त्यांच्यानंतर त्याच्या वारशांकडे त्याचे राज्य गेले. परंतु, पुढे त्यांच्या वारशांना राज्याची प्रगती करता आली नाही.

Back to top button