जपान किरणोत्सारी पाणी पॅसिफिक महासागरात सोडणार | पुढारी

जपान किरणोत्सारी पाणी पॅसिफिक महासागरात सोडणार

टोकिओ, वृत्तसंस्था : जपान लवकरच अणुऊर्जा प्रकल्पातील खराब झालेल्या किरणोत्सारी पाणी पॅसिफिक महासागरात सोडणार आहे. यासाठी युनोच्या आण्विक नियंत्रणकडून (वॉचडॉग) मान्यता मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा एजन्सीचे (आयएईए) प्रमुख रॉफेल ग्रोसी मंगळवारी जपानमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांची भेट सुरक्षेचा आढावा घेतला.

आयएईएनुसार, किरणोत्सारी पाणी पॅसिफिक महासागरात सोडण्याची जपानी योजना सुरक्षा मानांकनुासर आहे. मात्र, जपानच्या किनारी भागात राहणार्‍या नागरिकांकडून आणि चीनसह अन्य देश विरोध करत आहेत. पॅसिपिक महासागरात 132 कोटी लिटर सोडण्याच्या निर्णयावर जपानचा मासेमारी उद्योग आणि नागरी सोसायटी गटांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. कारण मार्च 2011 मध्ये आलेल्या सुनामीमुळे फुकुशिमाच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा कूलिंग प्रकल्प आणि वीजपुरवठा यंत्रणा ठप्प झाली.

2021 मध्ये घोषणा

अल जजिराच्या वृत्तानुसार, अणुऊर्जा प्रकल्पाील पाणी सोडण्याची घोषणा 2021 मध्ये करण्यात आले होती. हे काम येत्या दोन वर्षांत सुरू केले जाणार असल्याचे त्यावेळी सांगितले होते. जपानच्या रेग्युलेटरी समितीने चाचणी पूर्ण केली होती. युनोच्या चौकशीनंतर प्रकल्पाची देखभाल करणार्‍या टेफको कंपनी पाणी सोडण्याची परवाना मिळाला होता. मात्र पाणी कधी सोडणार याची तारीख घोषित करण्यात आली नव्हती. पाणी 1 किलोमीटर व्यासाच्या पाईपमधून सोडले जाणार आहे.

Back to top button