Coffee Bill : दोन कप कॉफीचे बिल तब्बल तीन लाख ६७ हजार | पुढारी

Coffee Bill : दोन कप कॉफीचे बिल तब्बल तीन लाख ६७ हजार

वॉशिंग्टन : Coffee Bill : दोन कप कॉफीचे बिल किती येईल? फार फार तर १००, २०० किंवा अधिकाधिक एक हजार रुपये. पण अमेरिकेतील एका दाम्पत्याने दोन कप कॉफीचे बिल क्रेडिट कार्डवरून भरले आणि त्यांना तब्बल ३ लाख ६७ हजारांचा फटका बसला.

Coffee Bill : सीबीएस न्यूजच्या बातमीनुसार, अमेरिकेतील जेसी आणि ओडेल दाम्पत्य अमेरिकेतील स्टारबक्समध्ये कॉफी पिण्यासाठी गेले. त्यांनी दोन कप कॉफीची ऑर्डर केली. त्याचे पैसे क्रेडिट कार्डद्वारे दिले. काही वेळाने ते दोघेही एका दुकानात खरेदीसाठी गेले आणि तेथील बिल भरताना कार्डवर काहीही शिल्लक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Coffee Bill : चौकशी केली असता स्टारबक्समध्ये कॉफीसाठी बिल अदा केल्यावर त्यांच्या खात्यातून ३ लाख ६७ हजार रुपये कापले गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने स्टारबक्सच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार ही मानवी चूक आहे. कंपनीने नंतर त्यांना अतिरिक्त रकमेचा चेक दिला, पण तो बाऊन्स झाल्याचे दाम्पत्याचे म्हणणे आहे.

Back to top button