इराणने बांधला जमिनीखाली हवाईतळ | पुढारी

इराणने बांधला जमिनीखाली हवाईतळ

तेहरान; वृत्तसंस्था :  इराणने इस्त्रायली आणि अमेरिकी हवाई हल्ल्यांपासून आपल्या सैन्यदल सामग्रीचा बचाव करण्यासाठी जमिनीखाली लष्कराचे व हवाई दलाचे तळ उभारले असून, असे किमान 12 तळ तयार करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरला महंमद बघेरी यांनी ओघाब 44 या जमिनीखालील हवाई तळाची पाहणी केल्यानंतर सांगितले की, हा तळ कार्यान्वित झाला असून जमिनीखाली अनेक लढाऊ विमाने व त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे विभाग तसेच हवाई दलाचे जवान यांना राहण्याची सोय करण्यात आली आहे. जमिनीखाली अत्यंत मजबूत बांधकाम करण्यात आले असून, अमेरिकी तसेच इस्त्रायली उपग्रहांनाही ते शोधणे अवघड आहे. या तळातूनच विमाने थेट आकाशात झेप घेऊ शकतात व हल्ला करून परत येऊ शकतात. इस्त्रायली आणि अमेरिकी हवाई हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सगळी यंत्रणा त्यात तयार आहे, असेही ते म्हणाले.

त्यांच्या कार्यालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या छायाचित्रांत तळावर अमेरिकेचे फॅन्टम बाँबर विमान, तसेच एफ 4, रशियन सुखोई आदी विमाने दिसत आहेत. इराणमध्ये इस्लामी क्रांती होण्याआधी असलेल्या राजवटीत अमेरिकेने इराणला ही विमाने दिलेली आहेत. या विमानांचा वापर इराकसोबतच्या युद्धात तसेच मध्यंतरी आयसीस विरुद्धच्या मोहिमेतही करण्यात आला होता.

Back to top button