म्यानमार लष्कराचा एअरस्ट्राईक; बंडखोर गटातील 50 वर लोक ठार | पुढारी

म्यानमार लष्कराचा एअरस्ट्राईक; बंडखोर गटातील 50 वर लोक ठार

यंगून; वृत्तसंस्था :  काचीन राज्यात एका स्थानिक बंडखोर गटाने आयोजिलेल्या मैफलीवर म्यानमार लष्कराने हवाई हल्ला चढविला. त्यात 50 वर लोक मरण पावले, तर 70 वर जखमी झाले.

म्यानमार लष्कराच्या दोन लढाऊ विमानांनी काचीन स्वतंत्र लष्कराने आयोजिलेल्या या कार्यक्रमावर बॉम्बहल्ले केले, असे स्वतंत्र लष्कराचे कर्नल नॉ बू यांनी सांगितले. काचीन स्वतंत्र लष्कराच्या सैनिकांसह 50 च्या जवळपास नागरिक मरण पावले. स्थानिक माध्यमांनी मृतांचा आकडा 60 असल्याचे म्हटले आहे. म्यानमारमधील संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यालयाने सांस्कृतिक कार्यक्रमातील या हल्ल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Back to top button