काबूलमध्‍ये अफगाण नागरिक रस्‍त्‍यावर, तालिबान्‍यांचा गोळीबार | पुढारी

काबूलमध्‍ये अफगाण नागरिक रस्‍त्‍यावर, तालिबान्‍यांचा गोळीबार

काबूल ; पुढारी ऑनलाईन : काबुलमध्‍ये आज पाकिस्‍तानविरोधात अफगाण नागरिक रस्‍त्‍यावर उतरले. शेकडो पुरुष व महिलांनी राष्‍ट्रपती भवनकडे कूच केली. यावेळी नागरिकांवर तालिबानांच्‍या गोळीबार केला. या  घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

पाकिस्‍तान मुर्दाबादच्‍या घोषणा

पाकिस्‍तानविरोधात रस्‍त्‍यावर उतरलेल्‍या अफगाण नागरिकांनी पाकिस्‍तान मुर्दाबादच्‍या जोरदार घोषणा दिल्‍या. तसेच पाकिस्‍तानची गुप्‍तचर संस्‍था आयएसआय प्रमुखानेही अफगाणिस्‍तान साेडून जावे, अशी मागणी केली.

असवाका वृत्तसंस्‍थेने दिलेल्‍या माहितीनुसार, पाकिस्‍तानची गुप्‍तचर संस्‍था आयएसआयचे प्रमुख फैज हमीद मागील काही दिवस काबूलमध्‍येच वास्‍तव्‍याला आहेत.

महिलांची संख्‍या लक्षणीय

पंजशीरमधील नाॅदर्न अलायन्‍सच्‍या  सैनिकांवर पाकिस्‍तानच्‍या हवाई दलाने हल्‍ला केला. याच्‍या निषेधार्थ काबूलमधील नागरिक रस्‍त्‍यावर उतरले. यामध्‍ये महिलांची संख्‍या लक्षणीय होती. पाकिस्‍तानची गुप्‍तचर संस्‍था आयएसआयचा प्रमुख फैज हमीदचे  गेली आठ दिवस अफगाणिस्‍तानमध्‍येच वास्‍तव्‍य आहे. याविरोधात काबूलमध्‍ये नागरिक रस्‍त्‍यावर उतरले. फैज हमीद याचे वास्‍तव्‍य असणार्‍या हॉटेलबाहेर जाण्‍यासाठी नागरिकांनी कूच केली.

नागरिकांनी यावेळी पाकिस्‍तान मुर्दाबादच्‍या घोषणा दिल्‍या. तसेच फैज हमीद चले जाव, अशा घोषणाही  दिल्‍या.

दरम्‍यान, अफगाणिस्‍तानमध्‍ये तालिबान्‍यांना मदत करण्‍यासाठी पाकिस्‍तानने केलेल्‍या मदतीचा इराणनेही निषेध केला आहे. अफगाणिस्‍तानमध्‍ये कोणत्‍याही बाहेर देशाने हस्‍तक्षेप करु नये, असे इराणने म्‍हटले आहे.

अमेरिकेच्‍या सैन्‍य अधिकार्‍यांनीही अफगाणिस्‍तानमधील हल्‍ल्‍यांमागे ‘आयएसआय’चा हात असल्‍याचे म्‍हटले आहे. मात्र पाकिस्‍तानने हा आरोप फेटाळला आहे.

साेमवारी तालिबान्‍यांनी पंजशीवर कब्‍जा केला हाेता. यावेळी पाकिस्‍तानच्‍या मदतीने पंजशीरवर हवाई  हल्‍ला करण्‍यात आल्‍याचे नाॅदर्न अलायन्‍सने म्‍हटले हाेते.

अफगाणिस्‍तानमधील सर्व प्रांतावर कब्‍जा केल्‍याची घाेषणा तालिबानने केली हाेती.

पंजशीरमधील नाॉदर्न अलायन्‍सने तालिबान्‍यांविराेधातील लढाई सुरुच ठेवणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र हाेईल, असे मानले जात आहे.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button