वनिता खरात फोटोशूट : ये जानेमन, जाने दिलपर होगा क्या असर | पुढारी

वनिता खरात फोटोशूट : ये जानेमन, जाने दिलपर होगा क्या असर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकप्रिय चित्रपट कबीर सिंगमध्ये झळकलेली कॉमेडीयन वनिता खरात ही न्यूड फोटोशूट केल्यानंतर रातोरात चर्चेत आली होती. आता तिने पुन्हा नवा फोटोशूट केला आहे. या फोटोमध्येही ती खूप सुंदर दिसतेय. काही फोटोंमध्ये ती ग्लॅमरस दिसतेय. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

 

 

एका फोटोला तिने कॅप्शन लिहिलंय की-जिस दिन तुमको देखेगी नजर. जाने दिल पर होगा क्या असर. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. सुंदर, हॉट आणि अप्रतिम म्हणत चाहत्यांच्या तोंडून कौतुकाचे बोल ऐकायला मिळत आहेत.

वनिता सोनी मराठीवरील कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रामधून लोकप्रिय झाली होती. ती या शोची विजेतीही ठरली होती.

 

न्यूड फोटोशूट केल्याने चर्चेत

मध्यंतरी, वनिताने न्यूड फोटोशूट केले होते. त्यामुळे तिला टीकेला सामोरे जावे लागले होते. तिच्‍या न्यूड फोटोशूटची एकच चर्चा सुरू झाली होती.तिने रावण फ्युचर प्रॉडक्शन्ससाठी हे फोटोशूट केलं होतं.

दिग्दर्शक अभिजित पानसे, ॲडगुरू-अभिनेता भरत दाभोळकर आणि फोटोग्राफर तेजस नेरूरकर यांची ही संकल्पना होती.

न्यूड फोटोशूटमुळे प्रसिध्दीच्या झोतात

वनिताने एका हातात निळ्या पतंगाचा आडोसा घेत न्यूड फोटोसाठी पोझ दिली होती. तिने हा फोटोशूट एका कॅलेंडरसाठी केले होते. फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी तिचा हा फोटो काढला होता. शिवाय #BodyPositivity असा हॅशटॅग वापरत हा फोटो शेअर करण्यात आला होता.

वनिताने आपल्या फोटोबरोबर एक पोस्टही लिहिली होती. ‘मला माझ्या प्रतिभेचा अभिमान आहे. माझी आवड, माझा आत्मविश्वास आणि मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. कारण, मी मी आहे.’ (I am proud of my talent, my passion, my confidence, I am proud of my body… because I am ME…!!!”) .

त्याचबरोबर, बॉडी पॉझिटिव्हीटी चळवळीत सहभागी व्हा. अशीही कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. (Let’s get together to join this Body Positivity Movement)

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by VANITA KHARAT (@vanitakharat19)

 

View this post on Instagram

 

A post shared by VANITA KHARAT (@vanitakharat19)

 

View this post on Instagram

 

A post shared by VANITA KHARAT (@vanitakharat19)

Back to top button