नाशिक ; पुढारी ऑनलाईन : वाघाची 'मावशी' मांजराला का म्हटलं जातं, याची प्रचिती नाशिक जिल्ह्यातील एका गावात आली. कारणही तसेच हाेते. ही वाघाची 'मावशी' बिबट्यासह विहिरीत पडली. थेट जीवावर बेतलेले हे संकट तिने मोठ्या धैर्याने परतवले. तिने बिबट्याशी केलेली लढाईचा व्हिडिओ सध्या साोशल मीडियावर व्हायरल हाेत असून, संकटाशी दोन हात कसे करावे, हे तिने दाखवून दिले आहे.
नाशिक मधून बिबट्या आणि मनीमाउचा एक अफलातून व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये बिबट्या शिकारीसाठी मांजराच्या पाठिमागे लागतो अन् थेट विहिरीत जाउन पडतो. दरम्यान मांजरही विहिरीत जाउन पडले. मग काय बिबट्या आणि मांजर दोघेही समोरा-समोर आले अन् मग जे काही घडले ते साऱ्या महाराष्ट्रान पाहिलं, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
समोर जर ताकदवान शत्रू असेल आणि मरण समोर दिसत असेल अशावेळी भले-भले नांगी टाकतात. मग मांजरासमोर बलाढ्य बिबट्या उभा ठाकला असेल तर मग मरणाच व्दार सताड उघडलच म्हणून समजा. असाच काहीसा प्रसंग मांजरावर ओढावला.
बिबट्या इवल्याशा मांजराच्या शिकारीसाठी मांजराच्या पाठिमागे लागला. घाबरलेले मांजर जीवाच्या अकांताने धावू लागले. या दरम्यान दोघेही विहिरीत जावून पडले.
दोघेही विहिरीच्या आत कठड्यावर चढून बसले. बिबट्याने इवल्याशा मांजरामुळे विहिरीत पडल्याच्या रागातून मांजरावर चाल केली.
तेंव्हा आपल्या पेक्षा ताकदीने कितीतरी मोठ्या असलेल्या बिबट्यासमोर इवल्याशा मांजराने जे धैर्य दाखवलं ते अफलातून होतं.
बिबट्याने मांजरावर पंजा उचलला तेंव्हा मांजरानेही आपला पंजा उचलून प्रतिकार केला. तेंव्हा काहीवेळ बिबट्याही शांत बसला.
यानंतर बिबट्याची नजर चुकवून मांजर त्याच्या पाठिमागे जात असल्याचे व्हिडिओत दिसते. या व्हिडिओ मध्ये मांजर हळूच बिबट्याचे लक्ष चुकवून त्याच्या पाठिमागे जात असल्याचे दिसते.
बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच आसपासच्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. लोकांनी बिबट्या आणि मांजराच्या शिकारीचा हा व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर शेअर केला.
यानंतर वनविभागाच्या पथकाने या बिबट्या आणि मांजराला विहिरीतून सुखरूप बाहेर काढल्याची माहिती समोर येत आहे.
यावरून मांजरही सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान बिबट्याला जंगलात सुरक्षीत सोडण्यात आले.
मांजराने आपल्यापेक्षा आकाराने आणि ताकदीने अधिक असलेल्या बिबट्याशी पंगा घेतला.
तिने ज्या प्रकारे बिबट्याला तोंड दिले ते पाहून हे मांजराच्या धाडसाने नेटकऱ्यांकडून कौतुक हाेत आहे.
हेही वाचलं का ?