40 हजार कोटींचे हॉटेल, दुबईत चंद्र भेटेल! | पुढारी

40 हजार कोटींचे हॉटेल, दुबईत चंद्र भेटेल!

दुबई वृत्तसंस्था : जीवाची मुंबई करण्यासह जीवाची दुबई करणार्‍यांची संख्याही अलीकडे वाढली आहे. जगातील सर्वात उंच ‘बुर्ज खलिफा’ ही इमारत, ‘बुर्ज अल-अरब’सारखे संग्रहालय त्याला कारणीभूत ठरले आहे. आता याच मालिकेत दुबईमध्ये एक आलिशान रिसॉर्ट उभारण्यात येत असून, ‘चंद्र’ ही या रिसॉर्टची मध्यवर्ती कल्पना आहे.

  • या रिसॉर्टवर 5 अब्ज अमेरिकन डॉलर (भारतीय चलनात 40 हजार कोटी रुपये) खर्च केले जाणार आहेत.
  • रिसॉर्ट उभारणीचे काम कॅनडातील ‘मून वर्ल्ड रिसॉर्टस् इंटरनॅशनल’कंपनीला देण्यात आले आहे. मुख्य इमारत 735 फूट उंच असेल.
  • येत्या 4 वर्षांत ती बांधून होईल. मुख्य मार्ग गोलाकार असेल. दरवर्षी 25 लाख पर्यटक भेट देतील, अशी अपेक्षा आहे.

या अद्ययावत सुविधा

  • स्पा सेंटर, नाईट लाईफसाठी विशेष सेक्शन्स
  • सर्वात वरच्या मजल्यावरील कसिनो, नाईट क्लब्स
  • गच्चीचा एक तृतीयांश भाग हा बीच क्लबसाठी
  • लगूनसह रिसॉर्टमध्ये अ‍ॅम्पी थिएटरचीही सुविधा

दुबईतील पर्यटनाला गेल्या काही वर्षांत बहर आलेला आहे. 2022 च्या पहिल्या सहामाहीत पर्यटनातील उलाढालीने 19 अब्ज दिर्‍हमचा (5.2 अब्ज अमेरिकन डॉलर) टप्पा ओलांडला आहे.
– शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम, प्रमुख, दुबई

Back to top button