इराकमध्ये ‘नोज ब्लड’ तापाचा कहर; 19 मृत्यू | पुढारी

इराकमध्ये ‘नोज ब्लड’ तापाचा कहर; 19 मृत्यू

बगदाद : वृत्तसंस्था : इराकमध्ये सध्या ‘नोज ब्लड फिव्हर’चे 111 रुग्ण विविध ठिकाणी आढळलेले आहेत. यापैकी 19 जणांचा मृत्यू झाला आहे. पाळीव जनावरांच्या अंगावरील कीटक माणसाला चावल्यास हा आजार उद्भवतो. या विषाणूजन्य आजारावर कुठलीही लस उपलब्ध नाही. भारतात अद्याप या आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही. पण इराकमधील स्थिती पाहता केंद्रीय आरोग्य विभाग अलर्टवर आहे.

आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या नाकातून रक्त वाहते. यातूनच त्याला ‘नोज ब्लड फिव्हर’ असे म्हणतात. क्रिमियन-कांगो हॅमॉरेजिक तापही याला म्हटले जाते. लागण झाल्यानंतर 3 दिवसांनी लक्षणे दिसायला लागतात. संक्रमण 13 दिवसांपर्यंत राहते. अंगावर लालसर पुळ्या येतात.

कुणाला अधिक धोका?

जनावरे व्यावसायिक, राखण करणारे, घरात पाळीव प्राणी असलेले
संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने, शिंकेने, रक्तातून इतरांमध्ये प्रादुर्भाव शक्य

Back to top button