कोरोनाची तिसरी लाट : अमेरिका, इंग्‍लंडमध्‍ये काेराेनाबाधित मुलांच्‍या संख्‍येत वाढ | पुढारी

कोरोनाची तिसरी लाट : अमेरिका, इंग्‍लंडमध्‍ये काेराेनाबाधित मुलांच्‍या संख्‍येत वाढ

वॉशिंग्‍टन ; पुढारी ऑनलाईन : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्‍याचे तज्‍ज्ञांनी यापूर्वीच स्‍पष्‍ट केले आहे. आता कोरोनाची तिसरी लाट आलेल्‍या अमेरिका आणि इंग्‍लंडमध्‍ये मुलांमधील कोरोना संसर्गामध्‍ये वाढ झाली आहे. भारतासाठी ही धोक्‍याची घंटा मानली जात आहे. दुसर्‍या लाटेत युरोप आणि अमेरिकेमध्‍ये अशाच स्‍वरुपाची रुग्‍णवाढ आढळली होती. मात्र यानंतर त्‍यांनी यावर नियंत्रण मिळवले. मात्र भारतातील काही राज्‍यांमध्‍ये विशेषत: महाराष्‍ट्राला दुसर्‍या लाटेचा जबर फटका बसला आहे.

अमेरिकेतील अलबामा, अरकंसास, लुसियाना आणि फ्‍लाेरिडा येथे १८ वर्षांखालील मुलांमधील वाढती रुग्‍णसंख्‍या चिंताजनक आहे. मागील काही दिवसांमध्‍ये अरंकसास येथे मुलांसाठीच्‍या विशेष रुग्‍णालयात दाखल होणार्‍या मुलांच्‍या संख्‍येत ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यामध्‍ये सात अर्भकांवर अतिदक्षता विभागात तर दोघांना व्‍हेंटिलेटरवर ठेवण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

लुसियानामध्‍ये जुलै अखेर तब्‍बल ४ हजार २३१ मुलांना कोरोनाचा संसर्ग

लुसियानामध्‍ये जुलै अखेर तब्‍बल ४ हजार २३१ मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  १५ ते २१ जुलै दरम्‍यान ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्‍या ६६ मुले कोरोनाबाधित झाले आहेत.

इंग्‍लंडमध्‍ये दररोज ४० मुले होतायत रुग्‍णालयात दाखल

इंग्‍लंडमध्‍ये दररोज कोरोनाबाधित ४० मुले रुग्‍णालयात दाखल होत आहे. भारतातही कोरोनाच्‍या पहिल्‍या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेमध्‍ये सर्वाधिक मुले बाधीत झाली हाेती. त्‍यामुळे तिसर्‍या लाटेमध्‍ये भारतात मुलांना संसर्ग होण्‍याची भीती वैद्‍यकीय क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले आहे.

अमेरिकेतील ब्रिस्‍टल विद्‍यापीठातील बालरोग तज्‍ज्ञ प्रो. एडम फिन्‍न यांनी म्‍हटले आहे की, लहान मुलांना होणार्‍या कोरोना संसर्गाचा धोका कमी झालेला नाही. मागील काही दिवसांमध्‍ये मुले हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. त्‍यामुळे कोरोनाच्‍या दोन्‍ही लाटांपेक्षा तिसरी लाटही वेगळी असले असे स्‍पष्‍ट होत आहे, असेही ते म्‍हणाले.

मुलांसाठीही हवे लसीकरण

लंडनमधील इंपीरियल महाविद्‍यालाच्‍या रोग विशेष तज्‍ज्ञ डॉ. व्‍हिटकर यांनी म्‍हटले आहे की, अमेरिका आणि ब्रिटनमध्‍ये १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्‍या मुलांमध्‍ये कोरोना संसर्गामध्‍ये वाढ झालेली आहे. यामध्‍ये बहुतांश मुलांना लसीकरण झालेले नाही.त्‍यामुळेचा आता मुलांसाठीही कोरोना प्रतिबंधक लस देण्‍यात यावी, अशी मागणी होत आहे.

वैद्‍यकीय क्षेत्रातील तज्‍ज्ञांच्‍या मते, स्‍थूल आणि मधुमेहग्रस्‍त मुलांना कोरोना संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे.

अमेरिका आणि इंग्‍लंडमध्‍ये मुलांमध्‍ये करोनाना बाधितांची संख्‍या वाढत आहे. यावर वेळेच उपचार होणे आवश्‍यक आहे. तसेच सर्वच देशांमध्‍ये मुलांनाही लस उपलब्‍ध होणे गरजेचे आहे.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडीओ : बदलती शिक्षण पद्धती स्वीकारा – डॉ. अरुण पाटील

 

Back to top button