उत्तर कोरियाची जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी | पुढारी

उत्तर कोरियाची जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी

सेऊल : पुढारी ऑनलाईन

उत्तर कोरियाने पुन्हा एकदा जपानच्या समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले. या वृत्ताला दक्षिण कोरियाने दुजोरा दिला आहे. यामुळे संपूर्ण जग हादरले आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्याने जगाला धोका निर्माण झाला आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जगभरातील देशांनी या चाचणीची गंभीर दखल घेतली आहे.

उत्तर कोरियाने या आधी सप्टेंबरमध्येही क्षेपणास्त्र चाचणी केली होती. या क्षेपणास्त्र चाचणीची दखल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे. क्षेपणास्त्र चाचणीनंतर ट्विटरवरुन उत्तर कोरियला ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. उत्तर कोरियाची जगासाठी ही धमकी असले तर त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी जगाला धोकादायक असल्याचे म्हटले. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यासाठी उत्तर कोरियाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच उत्तर कोरियाकडून २०१८ पर्यंत अत्याधुनिक आणि सक्षम क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येईल, असे दक्षिण कोरियाने म्हटले.

Back to top button