गरीब गरीबच… श्रीमंत आणखी श्रीमंत | पुढारी

गरीब गरीबच... श्रीमंत आणखी श्रीमंत

टोकिओ : पीटीआय

जगामध्ये गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक दरी दिवसेंदिवस रुंदावत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. गरीब गरीबच आणि श्रीमंत आणखी श्रीमंत अशीच वाटचाल जगातील बहुतेेक देशांमध्ये सुरू असल्याचे एका अहवालातून उघडकीस आले आहे.

विख्यात अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी आणि इम्युनेल सेज यांच्यासारख्या तज्ज्ञांचा समावेश असलेल्या संशोधकांनी गरीब आणि श्रीमंतामधील विषमतेवरील अहवाल प्रसिद्ध केला आहे. वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट 2018 या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारत आणि चीनमधील उपेक्षितांच्या उत्पन्नात काहीशी वाढ झाली असली तरी आर्थिक विषमतेमधील तफावत मोठी असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.

पाश्‍चात्त्य युरोपमधील देशांमध्ये आर्थिक विषमतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. 1980 पासून गरीब आणि श्रीमंतांमधील विषमतेमध्ये वाढ होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेसह बहुतांश देशांमध्ये एकूण उत्पन्नापैकी एक टक्के लोकांकडेच उत्पन्नाचा वाटा अधिक असल्याचे पाहावयास मिळते. गेल्या पंधरा वर्षांपासून जगभरातील सरकारच्या आर्थिक धोरणांचा अभ्यास संबंधित संस्थेमार्फत करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

Back to top button