वॉशिंग्टनमध्ये रेल्वे घसरली; तिघांचा मृत्यू | पुढारी

वॉशिंग्टनमध्ये रेल्वे घसरली; तिघांचा मृत्यू

वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

वॉशिंग्टनमधील सियाटल भागात रेल्वेचे काही डब्बे घसरुन झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर १०० जण जखमी झालेत. या रेल्वे अपघाताचे कारण अद्यपही स्पष्ट झालेले नाही. सियाटलमधील एका वळणावरुन जात असताना हा अपघात झाला. 

एमट्रॅक रेल्वे त्याच्या नवीन तयार केलेल्या जलदगती मार्गावरुन पहिल्यांदाच जात असताना मोठा आवाज होऊन त्या रेल्वेचे काही डबे रुळावरुन घसरले. रेल्वेचे हे डबे रुळाखाली असलेल्या महामार्गावर कोसळले. या रेल्वेत ७७ प्रवासी आणि ७ कर्मचारी होते. या रेल्वेचे काही डबे  महामार्गावरुन जाणऱ्या दोन गाड्यांवर पडले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १२ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा नवीन रेल्वे मार्ग नुकताचा खुला करण्यात आला होता. या मार्गामुळे प्रवासातील जवळपास १० मिनिटे वाचणार होते. पण, पहिल्याच प्रवासात ही दुर्घटना झाली.  

या दुर्घटनेची कारणे शोधण्यासाठी एमट्रॅक रेल्वेच्या गतीची तपासणी करण्यात येत आहे. तसेच वळणावर या रेल्वेची गती काय होती हे ही तपासण्यात येईल, असे वॉशिंग्टन रेल्वे प्रशासनाने सांगितले.   
 
 

Back to top button