चीनमध्ये जनसमुदायासमोर दहा जणांना फाशी | पुढारी

चीनमध्ये जनसमुदायासमोर दहा जणांना फाशी

बिजिंग : वृत्तसंस्‍था

चीनमध्ये विविध गुन्‍ह्यात अटक करण्यात आलेल्या दहा जणांना जनसमुदायासमोर फाशी देण्यात आली आहे. ज्या दहा जणांना फाशी देण्यात आली, ती फाशी देण्याची घटना बघण्यासाठी नागरिकांना आमंत्रण देण्यात आले होते. गुआंगडोंग प्रांतामध्ये ही घटना घडली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार विविध गुन्‍ह्यात दहा आरोपींना फाशी देण्यात आली होती. या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

ज्यांना फाशी देण्यात आली आहे, त्यातील काही आरोपी अंमली पदार्थांच्या तस्‍करीप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात होते. यामधील तिघांवर खून व दरोडा टाकण्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपींना फाशी देण्याची घटना बघण्यासाठी हजारो नारिकांनी स्‍टेडियमवर गर्दी केली होती. या घटनेवर विविध स्‍तरातून टीका होत आहे तर, काहीजण समर्थन करीत आहेत. सामाजिक संघटना, विधी तज्ञांकडून विरोध दर्शविण्यात येत आहे.

न्यायालयाकडून फाशी सुनावण्यात आल्यानंतर चार दिवस अगोदर नागरिकांना फाशीची घटना बघण्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. फाशी दिवशी पोलिस वाहनांमधून दहा जणांना स्‍टेडियमवर आणण्यात आले व हजारो नागरिकांसमोर त्यांना फाशी देण्यात आली. ही घटना पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्‍थित होते. यावेळी अनेक नागरिकांनी मोबाईलद्वारे या घटनेचे चित्रण केले आहे. फाशी देण्यात आल्यानंतर चित्रीत केलेला व्‍हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्‍हायरल झाला आहे.

Back to top button