भारताने शेजाऱ्याच्या हिताकडे लक्ष द्यावे : चीन  | पुढारी

भारताने शेजाऱ्याच्या हिताकडे लक्ष द्यावे : चीन 

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन

अमेरिकेकडून पाकिस्‍तानला होणारी मदत थांबवल्‍यामुळे चीनचा चांगलाच भडका उठला आहे. चीनच्या परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ता लु कांग यांनी अमेरिकेने पाकिस्‍तानच्या मदतीवर घातलेल्‍या बंदीला विरोध केला आहे. तर, चीनच्या सरकारी माध्यमांनी याला भारताला जबाबदार धरले आहे. भारताने आपल्‍या शेजाऱ्याच्या हिताकडे लक्ष द्यावे असा सल्‍ला चीनच्या सरकारी माध्यमांनी भारताला दिला आहे. 

गेल्‍या आठवड्यात अमेरिकेने पाकिस्तानची २५५ दशलक्ष डॉलरची (सुमारे १६०० कोटी) लष्करी मदत रोखली. दहशतवादाविरोधात पाकिस्तानच्या सहकार्यावरच आर्थिक मदतीचे भवितव्य अवलंबून आहे, असे अमेरिकेने पाकला ठणकावले होते.

याबाबत लू कांगने म्‍हटले आहे की,‘‘अमेरिकेकडून पाकिस्‍तानवर केलेला आरोप आणि त्‍याला दहशतवादाशी जोडने, याचा चीन विरोध करत आहे. दहशतवादाविरोधात कारवाई करने फक्‍त एका देशाची जबाबदारी नाही. तसेच भारताने आपल्‍या शेजाऱ्याच्या हिताकडे लक्ष द्यावे. चीनने नेहमीच कोणत्‍याही एका देशाला दहशतवादाबरोबर जोडण्याला विरोध केला आहे. तसेच दहशतवादाविरोधात लढण्याची जबाबदारी कोणत्‍याही एखाद्या देशावर सोपवण्यालाही आमचा विरोध आहे.’’

Back to top button