काश्मिरला भारतापासून मुक्ती द्या; ब्रिटनमध्ये प्रचार (Video) | पुढारी

काश्मिरला भारतापासून मुक्ती द्या; ब्रिटनमध्ये प्रचार (Video)

लंडन : पुढारी ऑनलाईन

ब्रिटनच्या संसदेतील खासदाराने भारताविरुद्ध प्रचार मोहीम सुरु केली आहे. भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित नसल्याचे या प्रचारातून ते सांगत आहेत. नाझिर अहमद  हे ब्रिटीश संसदेतील मुस्लिम खासदारांपैकी एक आहेत. भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित नसल्याचा प्रचार ५ फिरत्या गाड्यांमधून लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर केला. 

नाझीर अहमद यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनी निषेध नोंदवला आहे. त्यांनी भारतातून काश्मिरला मुक्त करण्याची मागणी केली आहे. ‘खलिस्तान जिंदाबाद, मुक्त काश्मिर’, असे फलक असलेल्या व्हॅन शहरातून प्रचार करत असल्याचा व्हिडिओदेखील त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरुन शेअर केला आहे. त्यात त्यांनी हिंदुत्ववादाविरोधात टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे अल्पसंख्यांक लोकांना बळजबरीने हिंदू बनवू पाहत आहेत, असे म्हटले आहे. 

दरम्यान, काही भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आयुक्तालयात एकत्र जमले. त्यांनी भारतविरोधी प्रचार करणाऱ्यांविरोधात चलो इंडिया हाऊसचा नारा दिला.

Back to top button