श्रीदेवीच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टेम दुबईतच होणार  | पुढारी

श्रीदेवीच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टेम दुबईतच होणार 

दुबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी मध्यरात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. त्‍यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलीवूडसह त्‍यांच्या चाहत्‍यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरून त्‍यांना श्रध्दांजली वाहिन्यात येत आहे. तर, त्‍यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी चाहत्‍यांनी साकाळपासूनच मुंबईतील त्‍यांच्या घरासमोर गर्दी केली आहे. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्‍यांचे पार्थिव मुंबईत पोहचेल. 

श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे पोस्‍टमॉर्टिंग दुबईतच करण्यात येणार असल्‍याने त्‍यांचे पार्थिव भारतात आणण्यास वेळ होत आहे.  फॉरेंसिक तपास अहवाल तयार झाल्यानंतर श्रीदेवीचे पार्थिव स्‍पेशल विमानाने मुंबईत आणण्यात येईल. 

या कारणांमुळे श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे होणार पोस्‍टमॉर्टिंग

दुबईच्या कायद्याप्रमाणे एखाद्या विदेशी नागरिकाचा अचानक मृत्यू झाला तर, त्या मृत्यूचा तपास करून पोस्टमॉर्टेम केले जाते. 

पोस्‍टमॉर्टेमनंतर मृत्यूचे खरे कारण समजू शकते. परदेशातील नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर प्रथम त्या देशातील दुतावासाला यासंदर्भात माहिती कविले जाते. 

दुतावासाकडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा पासपोर्ट रद्द केला जातो. त्यानंतर ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाते. 

पोस्‍टमॉर्टेमनंतर एक अहवाल दिला जातो, या अहवालात व्यक्‍तीच्या मृत्यूचे कारण स्पष्टपणे नमूद केले जाते. 

सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतरच त्या व्यक्तीचे पार्थिव विमानाने मायदेशी पाठवले जाते. 

Back to top button