श्रीदेवींच्या मृत्यूची केस बंद; बोनी कपूरना क्लिन चीट | पुढारी

श्रीदेवींच्या मृत्यूची केस बंद; बोनी कपूरना क्लिन चीट

दुबई : पुढारी ऑनलाईन 

गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेली प्रतिक्षा आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. सुपरस्टार श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी दुबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. या बाबतचे पत्र दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी आणि कपूर कुटुंबीयांबा देण्यात आले आहे. असे वृत्त खलीज टाईम्सने दिले आहे. त्यांच्या वृत्तानुसार दुबई पोलिसांनी ही केस बंद केली आहे आणि बोनी कपूर यांना देखील दुबई पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे श्रीदेवींच्या मृत्यूबाबत निर्माण झालेली साशंकता संपुष्टात आली आहे. 

श्रीदेवींच्‍या ‘सनसनी’ वृत्तांकनामुळे स्‍टार्स भडकले

श्रीदेवी यांच्या निधनामुळे ‘मणिकर्णिका’ थांबली..

गेल्या तीन दिवसांपासून श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात कधी येणार या बाबत चर्चा सुरु होती. श्रीदेवी यांचे चाहते आणि त्यांचे घरचे याच प्रतिक्षेत होते. त्यांचे पार्थिव इतके दिवस का ताब्यात दिले नाही या बाबत चाहत्यांमधून नाराजी होती. दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी देखील पार्थिव लवकरात लवकर कुटुंबीयांकडे सोपवण्यात यावे यासाठी प्रयत्न करत होते. याच संदर्भात अभिनेता आणि बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर आज दुबईला गेला आहे. श्रीदेवींचे पार्थिव आज रात्रीपर्यंत मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या वर उद्या अंत्यसंस्कार होतील असा अंदाज आहे.  

बालकलाकार ते लेडी सुपरस्टार श्रीदेवी

श्रीदेवी: अशी होती लाईफ स्टाईल, इतके घ्यायच्या मानधन 

 

Back to top button