फेसबुक डिलीट करण्याची हीच योग्य वेळ! | पुढारी

फेसबुक डिलीट करण्याची हीच योग्य वेळ!

न्यूयॉर्क: पुढारी ऑनलाईन

युजर्सचा डेटा लीक झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या फेसबुकला आणखी एक धक्का बसला आहे. व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी थेट फेसबुकच डिलीट करा, असे आवाहन जगभरातील युजर्सना केले आहे. अॅक्टन यांनी ट्विटरवरून It is time. #deletefacebook अशी पोस्ट केली आहे. 

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार केल्याच्या आरोपामुळे फेसबुक गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले आहे. जाहिरात कंपन्यांच्या कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सोमवारी फेसबुकचे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरले होते. त्यामुळे फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्कला एका दिवसात तब्बल ६.०६ अब्ज डॉलरचा (सुमारे ४० हजार कोटी रुपये) फटका बसला होता.

Image may contain: one or more people

वाचा संबंधित बातम्या: 

‘डेटा लीक’मुळे फेसबुकला कोट्यवधींचा फटका

ट्रम्प यांच्या प्रचारामुळे फेसबुक वादात

Tags : Brian Acton,Facebook,WhatsApp

Back to top button