‘यूएन’च्या सहाय्यक सरचिटणीसपदी सत्या त्रिपाठी   | पुढारी

'यूएन'च्या सहाय्यक सरचिटणीसपदी सत्या त्रिपाठी  

न्यू यॉर्क (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

भारताचे विकास अर्थतज्ज्ञ आणि पर्यावरणतज्ज्ञ सत्या एस. त्रिपाठी यांची संयुक्त राष्ट्रसंघात (यूएन) सहाय्यक सरचिटणीसपदी तसेच न्यू यॉर्कमधील पर्यावरण कार्यक्रमाचे (यूएनइपी) प्रमुख म्हणून नियुक्त झाली आहे. 

यूएनचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरस यांनी काल (सोमवारी) त्रिपाठी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. याबाबतची माहिती यूएनच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. यूएनमध्ये नियुक्त झालेले त्रिपाठी हे तिसरे भारतीय आहेत. ते यूएनमध्ये गेली 20 वर्षे युरोप, आशिया आणि आफ्रिकेमध्ये शाश्वत विकास, मानवी हक्क, लोकशाही प्रशासन आणि कायदेशीर सल्ला आदी क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच त्यांची गेल्या वर्षी यूएनइपीच्या ‘2030 शाश्वत विकास अजेंडा’ या कार्यक्रमात वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. 

विकास अर्थतज्ज्ञ आणि वकील म्हणून 35 वर्षे ते कार्यरत आहेत. त्यांनी ओडिशातील बेहरामपूर विद्यापीठातून कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.  

 

Back to top button