इराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; २९ जणांचा मृ्त्यू | पुढारी

इराणमध्ये सैन्य परेडवर हल्ला; २९ जणांचा मृ्त्यू

तेहरान : पुढारी ऑनलाईन 

इराणमध्ये लष्कर परेडवर एका हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात २९ जण मृत्युमुखी पडले आहेत. या हल्ल्यामध्ये २० जण जखमी झाले.  इराणमधील माध्यमांनी हल्ला करणाऱ्याचा तकरिफी गनमन असा उल्लेख केला आहे. हल्लेखोर इस्लामिक स्टेट ग्रुपचा असल्याचा संशय आहे.

वाचा : चीनने ‘त्या’ १० लाख मुस्लिमांना का डांबून ठेवलंय?

हल्लेखोर इराणी लष्करी वेशामध्ये होता. इराण लष्कराचा परेड कार्यक्रम चालला होता. तेथील जवळच्या एका पार्कमधून हल्लेखोराने हल्ला केला. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास १० मिनिटे गोळीबार सुरू होता. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळाली आहे. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैनिकांना बचावपथकाकडून उपचारासाठी नेत असतानाची छायाचित्रे प्रसिध्द झाली आहेत. 

अहवाज शहरामध्ये गेल्यावर्षी राहणीमानाचा दर्जा घसरल्याने सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली होती. इराणने १९८० ते ८८ च्या दशकामध्ये इराकविरुद्ध झालेल्या संघर्षाची आठवण म्हणून इराणमध्ये परेडचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

Back to top button