राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प धार्मिक स्‍वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करणार! | पुढारी

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प धार्मिक स्‍वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करणार!

वाशिंगटन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्‍प दोन दिवसाच्‍या भारत दौर्‍यावर २४ फेब्रुवारीपासून येत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यासोबत धार्मिक स्‍वातंत्र्य या मुद्दयावर चर्चा करण्‍याची शक्‍यता आहे. जगाचे धार्मिक स्‍वातंत्र्य कायम ठेवण्‍याच्‍या दृष्‍टीतून आज भारताकडे एक आदर्श म्‍हणून सर्वजण पाहत असल्‍याचे व्हाईट हाऊसमधील एका वरिष्‍ठ अधिकार्‍याने सांगितले. भारतातील लोकशाही पद्धत, परपंरा याचा अमेरिका सन्‍मान करत असल्‍याचे देखील या अधिकार्‍याने सांगितले. 

►सीएम उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्या वारी करणार

व्हाईट हाऊसमधील एका वरिष्‍ठ अधिकार्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, विविध धर्म आणि विविध भाषांनी भारत समृद्ध आहे. यासोबतच संस्‍कृतीच्‍या विविधतेने नटलेला देश आहे.  तसेच जगातील चार धर्माचा उगम देखील भारतातच झाल्‍याचे या अधिकार्‍याने सांगितले. 

►तब्बल १०० कोटींच्या कार्यक्रमात येऊन ट्रम्प नमस्ते म्हणणार पण..

‘या’ दोन मुद्दयावर डोनाल्ड ट्रम्‍प बोलणार 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्‍प सार्वजनिक आणि वैयक्‍तिक भाषणात लोकशाही परंपरा आणि धार्मिक स्‍वातंत्र्य या मुद्दयावर बोलणार असल्‍याचे या व्हाईट हाऊसमधील वरिष्‍ठ अधिकार्‍याने  सांगितले. या दोन मुद्द्‍यावर चर्चा करणार आहेत. विशेष करुन धार्मिक स्‍वातंत्र्य जे प्रशासनासाठी अत्‍यांत महत्‍त्‍वाचे आहे. 

►शिवस्तुतीवर कैलाश खेर ट्रम्प यांना नाचवणार…

यासोबतच सीएए व एनआरसीवर डोनाल्ड ट्रम्‍प  पंतप्रधान मोदी यांच्‍यासोबत चर्चा करणार असल्‍याची योजना आहे का असे देखील या अधिकार्‍याला विचारण्‍यात आले. यावर अधिकार्‍याने सांगितले की, आम्‍ही भारतातील लोकाशाही पद्धतीचा आदर करतो. तसेच अशा परंपरा पद्धती ठिकवून ठेवण्‍यासाठी आम्‍ही भारताला नेहमीच प्रोत्‍साहित करत राहणार असल्‍याचे या अधिकार्‍याने सांगितले. तुमच्‍याकडून विचारण्‍यात आलेल्‍या काही प्रश्‍नांने आम्‍ही चिंतेत आहे. राष्‍ट्राध्‍यक्ष मोदींसोबत बैठकीदरम्‍यान या मुद्द्‍यावर चर्चा करतील. 

Back to top button