डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ‘त्यामुळे’ पीएम मोदी चांगल्या मुडमध्ये नाहीत! | पुढारी

डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, 'त्यामुळे' पीएम मोदी चांगल्या मुडमध्ये नाहीत!

वॉशिंग्टन :  पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनमध्ये उद्भवलेल्या ताज्या सीमावादावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलल्याचे सांगितले. त्यांनी चीन सोबत सुरु असलेल्या सीमावादाबाबत मोदी हे चांगल्या मूडमध्ये नसल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर ट्रम्प यांनी भारत आणि चीन यांच्या सीमावादात आपण मध्यस्थाची भुमिका निभावण्यास तयार असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. 

गुरुवारी ओव्हल ऑफिसमधून बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जवळपास 140 कोटी लोकसंख्या असलेले, सामर्थ्यशाली सैन्यदल असेलेल दोन देश भारत आणि चीनमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. भारत खूष नाही तसेच चीनही नसणार. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो आहे. ते चीन बरोबर जे काही सुरु आहे त्याच्यावरुन चांगल्या मूडमध्ये अजिबात नाहीत.’ 

वाचा : देशात १४ कंपन्यांकडून लसनिर्मिती सुरू

ट्रम्प यांना त्यांनी बुधवारी केलेल्या मध्यस्थी करण्याबाबतच्या ट्विटसंदर्भात विचारले असता त्यांनी, ‘जर भारत आणि चीनला याचा फायदा होईल असे वाटत असेल तर मी मध्यस्थी करायला तयार आहे.’ असे सांगितले. पण, ट्रम्प यांनी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कधी बोलले हे स्पष्ट केले नाही.   

ट्रम्प यांनी बुधवारी ‘आम्ही भारत आणि चीन वादात मध्यस्थी करण्यास तयार तसेच सक्षम आहोत.’ असे ट्विट केले होते. ते म्हणाले होते. ‘आम्ही भारत आणि चीनला कळवले आहे की अमेरिका सध्या सुरु असलेल्या सीमावादात मध्यस्थी करण्यास तयार आहोत.’

वाचा : युद्धाची खुमखुमी करणाऱ्या चीनला अमेरिकेकडून आणखी एक तगडा झटका!

ट्रम्प यांच्या या मध्यस्थीच्या प्रस्तावावर भारताने काल गुरुवारी आम्ही सीमावाद शांततेने सोडवण्यासाठी चीन बरोबर चर्चा सुरु केली आहे असे सांगितले होते. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दोन्ही देशांनी लष्करी तसेच राजनैतिक स्तरावर सीमा वाद सोडवण्यासाठी व्यवस्था एक प्रस्थापित केली आहे. याद्वारे चर्चा करुन शांततेने हा वाद सोडवला जाईल असे सांगितले.

सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी भारत आणि चीनच्या फिल्ड कमांडरनी चर्चा सुरु केली आहे. 

Back to top button